Lokmat Money > बिझनेस न्यूज > अबब! चहा विकून उद्योगपती अब्जाधीश झाला; संपत्ती पाहून अनेकांचे डोळे दिपले

अबब! चहा विकून उद्योगपती अब्जाधीश झाला; संपत्ती पाहून अनेकांचे डोळे दिपले

वाचा त्यांनी कसं उभं केलं साम्राज्य.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 03:48 PM2023-08-18T15:48:26+5:302023-08-18T15:49:01+5:30

वाचा त्यांनी कसं उभं केलं साम्राज्य.

businessman became a billionaire by selling tea Chinese entrepreneur turns billionaire 3 dollar tea | अबब! चहा विकून उद्योगपती अब्जाधीश झाला; संपत्ती पाहून अनेकांचे डोळे दिपले

अबब! चहा विकून उद्योगपती अब्जाधीश झाला; संपत्ती पाहून अनेकांचे डोळे दिपले

तुम्ही केवळ चहा विकून अब्जाधीश होऊ शकता का? पण अशी एक व्यक्ती आहे, जिनं चहा विकून कोट्यवधींची कमाई केलीये. मेहनत आणि मनात जिद्द असेल तर यशाचं शिखर सहज गाठता येतं असं म्हणतात. चीनच्या एका उद्योजक चहा विकून अब्जाधीश झालाय.
या अब्जाधीश उद्योजकाचं नाव आहे वांग जियाओकून. ते चा पांडाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहे. जियाओकून यांनी नुकतीच एक फंडिंग राऊंड केली आणि त्यानंतर ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. त्यांच्या या चहा विक्रीच्या दुकानांच्या चेनचं मूल्य २.१ बिलियन डॉलर्स इतकं निश्चित करण्यात आलं होतं. फोर्ब्सनुसार त्यांची एकूण संपत्ती आता १.१ अब्ज डॉलर्स इतकी झाली.

याशिवाय त्यांचं ७ हजारांपेक्षा अधिक स्टोअर्सचं नेटवर्क आहे. फोर्ब्सनुसार त्यांच्या सिग्नेचर पेयांमध्ये मँगो पोमेलो सागो, तारो बबल टी आणि जास्मिन मिल्क ग्रीन टी यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांशी पेयांची किंमत ३.६० डॉलर्स किंवा त्याहून कमी आहे.

पत्नीचीही साथ
इतकंच नाही, तर वांग यांच्या पत्नीचीही कंपनीमध्ये ३३ टक्के भागीदारी आहे आमि त्यांची संपत्तीही ७०० मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे. हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या प्रीलिमिनरी प्रॉस्पेक्टसनुसार त्या सुपरवायझरी कमिटीच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे दैनंदिन कामकाच्या देखरेखीची जबाबदारी आहे.

२००८ मध्ये सुरुवात
चा पांडाची मूळ सुरुवात २००८ पासून झाली असं म्हणता येऊ शकतं. चीनमधील चेंगडू येथील छोट्या शाळेजवळ वांह यांनी एका छोट्या दुकानातून फळं आणि बबल टी विकण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांना मिळणारा प्रतिसाद वाढू लागला. २०२० पर्यंत चा पांडाच्या स्टोअर्सचं नेटवर्क ५३१ पर्यंत पोहोचलं. यानंतर त्यांनी फ्रेन्चायझी मॉडेल सुरू केलं आणि त्यांच्या व्यवसायाची खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली. या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत चा पांडाच्या स्टोअर्सची संख्या ७११७ स्टोअर्सपर्यंत वाढलीये. 
गेल्या वर्षी, चा पांडानं ५८०.३० दशलक्ष डॉलर्स इतकी कमाई केली, त्याच्या मागील वर्षाच्या तुलनेत ही १६ टक्क्यांनी अधिक होती. तर कंपनीचा नफाही २४ टक्क्यांनी वाढून १३२.३ दशलक्ष डॉलर्स झाला.

 16% अधिक. कंपनीचा नफा 24% वाढून $132.3 दशलक्ष झाला. प्रॉस्पेक्टसमध्ये उद्धृत केलेल्या फ्रॉस्ट अँड सुलिव्हनच्या संशोधनानुसार हे चीनमधील किरकोळ विक्रीद्वारे तिसरे सर्वात मोठे चहाचे दुकान होते. फ्रॉस्ट अँड सुलिव्हनच्या रिसर्चनुसार हे सर्वाधिक चहाची किरकोळ विक्री करणारं हे चीनमधील तिसऱ्या क्रमांकाचं स्टोअर होतं.

Web Title: businessman became a billionaire by selling tea Chinese entrepreneur turns billionaire 3 dollar tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.