Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Ambani : अदानी अंबानींमध्ये स्पर्धा, वर्षभरात अदानींनी १७ अब्ज डॉलर्समध्ये मिळवल्या ३२ कंपन्या

Adani Ambani : अदानी अंबानींमध्ये स्पर्धा, वर्षभरात अदानींनी १७ अब्ज डॉलर्समध्ये मिळवल्या ३२ कंपन्या

Adani Ambani : सध्या सर्वांचंच लक्ष उद्योजक गौतम अदानी यांच्यावर लागून आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ३० अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली आहे आणि ही वाढ कोणत्याही अब्जाधीशापेक्षा अधिक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 03:18 PM2022-05-24T15:18:04+5:302022-05-24T15:19:36+5:30

Adani Ambani : सध्या सर्वांचंच लक्ष उद्योजक गौतम अदानी यांच्यावर लागून आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत ३० अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली आहे आणि ही वाढ कोणत्याही अब्जाधीशापेक्षा अधिक आहे.

businessman gautam adani and mukesh ambani at a turning point in their rivalry in india | Adani Ambani : अदानी अंबानींमध्ये स्पर्धा, वर्षभरात अदानींनी १७ अब्ज डॉलर्समध्ये मिळवल्या ३२ कंपन्या

Adani Ambani : अदानी अंबानींमध्ये स्पर्धा, वर्षभरात अदानींनी १७ अब्ज डॉलर्समध्ये मिळवल्या ३२ कंपन्या

Gautam Adani Vs Mukesh Ambani: भारतीय टायकून मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात सध्या जबरदस्त शर्यत दिसून येत आहे. यावेळी सर्वांच्या नजरा गौतम अदानी यांच्यावर आहेत. जगातील सहाव्या सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानी यांनी या वर्षी त्यांच्या संपत्तीमध्ये जवळपास 30 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे, जी इतर कोणत्याही अब्जाधीशांपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची संपत्ती 104 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांची ही संपत्ती Tesla चे संस्थापक इलॉन मस्क यांच्या संपत्तीच्या जवळपास निम्मी आहे. तर रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यापेक्षा मात्र 10 अब्ज डॉलर्सनं अधिक आहे. इलॉन मस्क यांची संपत्ती 204 अब्ज डॉलर्स आणि मुकेश अंबानींची संपत्ती 95.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

रिन्युएबलएनर्जीवरून आमने-सामने
अंबानी आणि अदानी या दोघांनाही रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहेस. असं असलं तरी गुंतवणूकदारांनी अदानी यांना पसंती दिली आहे. 2020 मध्ये कोरोनाची महासाथ असतानाही मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 27 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. तर दुसरीकडे नुकतंच गौतम अदानी यांनी जगातील दिग्गज सीमेंट कंपनी होल्सिम लिमिडेटसोबत एक मोठा करार केला आणि 10.5 अब्ज डॉलर्समध्ये या कंपनीचा भारतीय व्यवसाय खरेदी केला. 

वर्षभरात 17 अब्ज डॉलर्स खर्च
ब्लूमबर्ग न्यूजनुसार गेल्या वर्षभरात अदानींनी ३२ कंपन्यांचं अधिग्रहण केलं. यासाठी अदानींनी 17 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. सध्या त्यांची ही वाढ थांबतानाही दिसत नाही आणि ते अनेक क्षेत्रांमध्ये अॅग्रेसिव्हही दिसून येत आहेत. एकीकडे अंबानी कंझ्युमरवर लक्ष केंद्रित करत आहेत, तर दुसरीकडे अदानी पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष देत असल्याचं दिसून येत आहेत. एक स्विस फर्म अंबुजा सीमेंट लिमिटेड आणि एसीसी लिमिटेडचा भारतीय व्यवसाय आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्न होती. परंतु अदानी यांनी सर्वाधिक बोली लावत हा व्यवसाय आपल्या समुहात सामील करून घेतला.

Web Title: businessman gautam adani and mukesh ambani at a turning point in their rivalry in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.