Join us

उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 6:50 AM

अदानी समूहाच्या शेअर्सच्या वाढीमुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत  ११ व्या स्थानी पोहोचले, तर मुकेश अंबानी घसरून १२ व्या स्थानी आले आहेत.

नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी पुन्हा एकदा ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. एकूण संपत्तीच्या बाबतीत त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या वाढीमुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत  ११ व्या स्थानी पोहोचले, तर मुकेश अंबानी घसरून १२ व्या स्थानी आले आहेत. 

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती यावर्षी २६.८ अब्ज डॉलर्सने (सुमारे २.२३ लाख कोटी) वाढून १११ अब्ज डॉलर्स (सुमारे ९.२६ लाख कोटी रुपये) इतकी झाली, तर मुकेश अंबानी यांची संपत्ती या वर्षात १२.७ अब्ज डॉलर्सने (१.०५ लाख कोटी रुपये) वाढून १०९ अब्ज डॉलर्स (९.०९ लाख कोटी) इतकी झाली आहे.

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय