Gautam Adani Charged: ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात आधीच कायदेशीर बाबींना सामोरे जात असलेल्या अदानी यांना अमेरिकेच्या न्यायालयात अब्जावधी डॉलर्सची कथित लाच आणि फसवणुकीप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टानं अदानी यांच्यावर कथित लाचखोरी, गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि फसवणुकीप्रकरणी आरोप करण्यात आलेत. या वृत्तानंतर अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आणि अदानी ट्रान्समिशन या अदानींच्या बॉन्ड्समध्येही घसरण झालीये.
न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. सोलार एनर्जीचं कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० मिलियन डॉलर्स देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं यात सांगण्यात आलं होतं. या प्रकरणात गौतम अदानी आणि त्यांच्या काही नातेवाईकांसह आठ जणांची नावं आहेत. बुधवारीच अदानींनी २० वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून ६० कोटी डॉलर्स उभारण्याची घोषणा केली होती. पण ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ही फंडरेजिंग योजना रद्द करण्यात आली आहे.
#BREAKING United States Justice Department indicts Gautam Adani and 7 other senior executives on charges to bribe Indian officials.
— Live Law (@LiveLawIndia) November 21, 2024
It is alleged that they “orchestrated an elaborate scheme to bribe Indian government officials to secure contracts worth billions of dollars and… pic.twitter.com/MsM3uS73TK
अमेरिकन अॅटर्नी ऑफिसकडून अदानींवर आरोप
गौतम अदानी, सागर अदानी, विनीत एस जैन यांनी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटं बोलून ही लाचेची रक्कम उभी केल्याचा आरोप आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत अदानींसह सर्वांनी भारत सरकारसाठी कंत्राटं मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचं मान्य केलं होते. या प्रकल्पातून २० वर्षांत २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नफा होईल, असा अंदाज होता, असंही आरोपात म्हटलंय.
या चौघांनी ब्रायबरी स्कीममध्ये ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनचा (एसईसी) तपास रोखण्याचा कट रचल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं. सागर अदानी यांनी लाचेचे पैसे ट्रॅक करण्यासाठी आपल्या फोनचा वापर केला. अदानींच्या कंपन्यांनी सुमारे २०० कोटी डॉलरचे एकूण २ सिंडिकेट कर्ज उभं केलं असंही यावेळी सांगण्यात आलं.
यामध्ये कोणाची नावं?
यामध्ये गौतम अदानी, सागर एस अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल काबेनेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा, रुपेश अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.