Join us

Mukesh Ambani : आता अंबानींची नजर नव्या बिझनेसवर, टाटा समुहाला देणार थेट टक्कर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 12:38 PM

Mukesh Ambani sets sight on new business : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील देशातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठी सिंगलब्रँड रेस्टॉरंट चेन सबवे इंकची (Subway Inc) भारतीय फ्रेंचाइझी खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. हा व्यवहार 20 ते 25 कोटी डॉलर, म्हणजेच 1,488 ते 1,860 कोटी रुपयांपर्यंत होऊ शकतो.

नवी दिल्ली - ग्रोसरी, एड-टेक, म्यूझिक, ई-फार्मसी, पेमेंट्स, फॅशन आणि फर्निचरनंतर आता मुकेश अंबानींची नजर क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QSR) व्यवसायावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील देशातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठी सिंगलब्रँड रेस्टॉरंट चेन सबवे इंकची (Subway Inc) भारतीय फ्रेंचाइझी खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. हा व्यवहार 20 ते 25 कोटी डॉलर, म्हणजेच 1,488 ते 1,860 कोटी रुपयांपर्यंत होऊ शकतो. (Businessman Mukesh Ambani sets sight on new business talks to put subway india on its plate)

सँडविच बनवणारी कंपनी सबवे इंकचे मुख्यालय अमेरिकेतील कनेक्टिकट येथे आहे. कंपनी भारतातील अनेक प्रादेशिक मास्टर फ्रँचायझींच्या माध्यमाने व्यवसाय करते. ही कंपनी जगभरात रिस्ट्रक्चरिंग करत आहे. यासंदर्भात अद्याप कंपन्यांनी कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.

टाटा ग्रुपशी थेट सामना - ही चर्चा यशस्वी ठरल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल युनिटला भारतातील सुमारे 600 सबवे स्टोअर्स मिळतील आणि त्याचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल. क्यूएसआर मार्केटमध्ये रिलायन्स रीटेलच्या एंट्रीने त्यांचा सामना थेट Domino’s Pizza, Burger King, Pizza Hut आणि Starbucks तसेच त्यांचे लोकल पार्टनर्स Tata Group आणि JubilantGroup सोबत होईल. मिळालेल्या माहितीनुसार, प्रायव्हेट इक्विटी कंपन्यादेखील सबवेच्या लोकल फ्रँचायझी ऑपरेशन्स खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Gautam Adani: मोदींचे दोन अब्जाधीश मित्र भिडणार! गौतम अदानींची रणशिंग फुंकले; मुकेश अंबानींनी सुरुवात केलेली

2017मध्ये सबवेच्या अनेक भारतीय फ्रँचायझींनी हातमिळवणी करून एक व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी TA Associates आणि ChrysCapital सारख्या आर्थिक गुंतवणूकदारांशीगी चर्चा केली होती. मात्र, ही चर्चा निष्कर्षापर्यंत पोहोचू शकली नाही. सबवेला एकाच भागीदाराद्वारे भारतात आपला व्यवसाय वाढवायचा आहे. सध्या, कंपनी मास्टर फ्रेंचायझींना नियुक्त करते जे थेट किंवा उप-फ्रँचायझींद्वारे स्टोअर्स चालवतात.

कुणाचा किती वाटा -डाबरचे प्रमोटर अमित बर्मन यांच्या लाइट बाइट फूड्सचा यात समावेश आहे. सबवेचा मालकी हक्क Doctor’s Associates कडे आहे. ही कंपनी प्रत्येक फ्रँचायझीकडून 8 टक्के रेव्हेन्यू घेते. भारताच्या 18,800 कोटी रुपयांच्या संघटित QSR मध्ये त्यांची 6 टक्के भागिदारी आहे. डोमिनोज 21 टक्के शेअरसह मार्केट लीडर आहे. तर मॅकडोनाल्ड 11 टक्के भागांसह  दुसऱ्या क्रमांकावर आहे.

New Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा

टॅग्स :मुकेश अंबानीरतन टाटारिलायन्सटाटाव्यवसाय