मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विविध विमान कंपन्यांतर्फे तिकीट दरामध्ये सूट योजना जाहीर करण्यात येत आहेत. या स्पर्धेमध्ये आता विस्तारा कंपनी देखील उतरली असून कंपनीने देशांतर्गत मार्गासाठी एकेरी प्रवासासाठी १,९९९ रुपये दर आकारणीची घोषणा केली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत ही सर्वात स्वस्त तिकीट योजना असल्याचे दिसून आले आहे.
विस्तारा कंपनीची विशेष सूटमंगळवारपासून (७ नोव्हेंबर) ही सूट योजना लागू होणार असून ९ नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल. ७ नोव्हेंबर ते १० एप्रिल २०२४ या कालावधीकरिता प्रवाशांना या तिकिटांची खरेदी करता येईल. इकॉनॉमी क्लाससाठी १,९९९ रुपये, प्रीमीयम इकॉनॉमी मार्गासाठी २,७९९ रुपये, तर बिझनेस क्लाससाठी १० हजार ९९९ रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करण्यात येणार आहे. हे सर्व दर एकेरी मार्गांसाठी लागू आहेत. प्रत्येक विमानातील मर्यादित जागांसाठी ही सूट योजना लागू करण्यात आली असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या पद्धतीने या तिकिटांची विक्री होणार आहे.