Join us

डिजिटल गोल्डने सात वर्षांत १००% पेक्षा जास्त परतावा! जाणून घ्या फिजिकल सोन्यापेक्षा यात गुंतवणूक किती फायद्याची?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 7:57 PM

सरकारच्या सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेची दुसरी सीरीज या आर्थिक वर्षासाठी सुरू झाली असून गुंतवणूकदार १५ सप्टेंबरपर्यंत बाजारभावापेक्षा कमी किमतीत डिजिटल सोने खरेदी करू शकतात.

लग्न असो किंवा कोणताही सण असो, सोने खरेदी करणे ही भारतातील परंपरा आहे, पण  जेव्हा गुंतवणुकीच्या पर्यायांचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या समोर सोनं ही पहिली पसंती समोर येते. पण डिजिटलायझेशनच्या या युगात सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. सरकार स्वत: लोकांना स्वस्त सोने विकत आहे आणि ते सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम म्हणजेच SGB स्कीमद्वारे विकले जात आहे. यामध्ये बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने उपलब्ध होते आणि सरकार गुंतवणुकीवर सुरक्षिततेची हमी देते. 

पैसे तयार ठेवा, ४ IPO मधून मिळणार कमाईची संधी; कधी अन् किती पैसे गुंतवायचे? पाहा डिटेल्स

सरकार विकत असलेले डिजिटल सोने खरेदी करायचे की दुकानात जाऊन फिजिकली सोने खरेदी करायचे? सोन्यात गुंतवणूक कुठे फायदेशीर ठरू शकते? तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे या दोघांपैकी कुठे गुंतवणे चांगले आहे ते पाहूया.

अगोदर आपण डिजिटल गोल्डबद्दल समजून घेऊ. हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. यामुळेच सरकारने २०१५ मध्ये सुरू केलेल्या स्वस्त सोन्याची विक्री करण्याच्या उपक्रमाला सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या आर्थिक वर्षासाठी सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेची दुसरी सीरीज सोमवार, ११ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाली आहे आणि ती १५ सप्टेंबरपर्यंत खुली राहील. म्हणजेच या तारखेपर्यंत तुम्ही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने खरेदी करू शकाल.

सरकारद्वारे विकले जाणारे सोने हे कागदी सोन्याचे किंवा डिजिटल सोन्याचा एक प्रकार आहे, यामध्ये तुम्ही किती प्रमाणात सोने कोणत्या दराने खरेदी करत आहात याचे प्रमाणपत्र दिले जाते.

हे डिजिटल सोने खरेदी करून परतावा मिळण्याची शक्यता जास्त आहे. SGB योजनेअंतर्गत, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केलेल्या सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. जर आपण फायद्यांबद्दल बोललो तर, सार्वभौम सुवर्ण बाँड वार्षिक २.५ टक्के व्याज देते आणि हा एक खात्रीशीर परतावा आहे. याशिवाय, सरकार या योजनेअंतर्गत सोने खरेदीवर निश्चित दरावर अतिरिक्त सवलत देखील देते. यामध्ये ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळते. 

यावेळी १ ग्रॅम सोन्याची किंमत जी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५,९२३ रुपये निश्चित करण्यात आली आहे, ती ऑनलाइन खरेदीवर ५,८७३ रुपये प्रति ग्रॅम असेल. योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ५०० ग्रॅम सोन्याचे रोखे खरेदी करू शकते, तर खरेदीदार किमान एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतो.

गुंतवणूकदार हे डिजिटल सोने रोखीने देखील खरेदी करू शकतात आणि खरेदी केलेल्या सोन्याच्या रकमेसाठी त्यांना समान मूल्याचे सार्वभौम सुवर्ण रोखे जारी केले जातात. त्याचा पूर्ण होण्याचा कालावधी ८ वर्षे आहे. पण ५ वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय देखील आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये तुम्ही २४ कॅरेट म्हणजेच ९९.९% शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता. 

२०१५ मध्ये लॉन्च झाल्यापासून, या योजनेला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि त्या बदल्यात त्यांना जोरदार परतावा देखील मिळाला आहे. सुरुवातीच्या वर्षात म्हणजेच वर्ष २०१५-१६ मध्ये, योजनेअंतर्गत सोन्याची किंमत प्रति ग्रॅम २,६८४ रुपये होती, तर २०२३-२४ च्या दुसऱ्या मालिकेसाठी ती ५,९२३ रुपये होती. म्हणजेच गेल्या सात वर्षांत या योजनेने सुमारे १२० टक्के परतावा दिला आहे.

फिजिकली सोनं खरेदी करणे ही सर्वात जुनी पद्धत आहे. डिजिटल सोन्यानंतर आता आपण फिजिकल सोनं खरेदी करण्याकडे कल कमी आला आहे. ही पद्धत देशातील सर्वात जुनी आणि सोपी आहे. म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन तुमच्या आवडीचे सोन्याचे दागिने खरेदी करा, घरी आणा आणि लॉकरमध्ये ठेवा. भारतातील लोक गुंतवणूक म्हणून सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करतात. भौतिक सोन्याची खरेदी काळासोबत डिजिटल झाली आहे, आज तुम्ही ज्वेलर्सकडे जाण्याऐवजी ऑनलाइन सोने खरेदी करू शकता. अनेक कंपन्या दागिने तुमच्या घरापर्यंत पोहोच करतात.

टॅग्स :सोनंचांदी