Lokmat Money > बिझनेस न्यूज > IDFC First Bank चा शेअर 10% डिस्काउंटवर खरेदी करा, RBI ने रिव्हर्स मर्जरला दिली मंजुरी

IDFC First Bank चा शेअर 10% डिस्काउंटवर खरेदी करा, RBI ने रिव्हर्स मर्जरला दिली मंजुरी

या शेअरने वर्षभरात दमदार परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:52 PM2023-12-27T17:52:37+5:302023-12-27T17:52:50+5:30

या शेअरने वर्षभरात दमदार परतावा दिला आहे.

Buy IDFC First Bank share at 10% discount, RBI approves reverse merger | IDFC First Bank चा शेअर 10% डिस्काउंटवर खरेदी करा, RBI ने रिव्हर्स मर्जरला दिली मंजुरी

IDFC First Bank चा शेअर 10% डिस्काउंटवर खरेदी करा, RBI ने रिव्हर्स मर्जरला दिली मंजुरी

IDFC फर्स्ट बँक रिव्हर्स मर्जर अंतर्गत IDFC लिमिटेडचे ​​स्वतःमध्ये विलीनीकरण करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही IDFC लिमिटेड आणि IDFC फायनान्शियल होल्डिंगच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स 10% सवलतीवर उपलब्ध झाले आहेत. दुपारच्या ट्रेडिंग दरम्यान, IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स 89 रुपयांवर तर IDFC लिमिटेडचे ​​शेअर्स 125 रुपयांवर व्यवहार करत होते. 

IDFC Ltd पॅरेंट कंपनी आहे
IDFC Ltd ही एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. ही समूहाची मूळ कंपनी आहे. IDFC फर्स्ट बँक पूर्णपणे बँकिंग व्यवसायात आहे. दोन्ही कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. आता याचे रिव्हर्स मर्जनर होणार आहे. पहिल्या टप्प्यात IDFC फायनान्शियल होल्डिंगचे IDFC लिमिटेडमध्ये विलीनीकरण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात, IDFC लिमिटेडचे ​​IDFC फर्स्ट बँकेत विलीनीकरण केले जाईल.

IDFC First Bank सिंगल कंपनी लिस्टेड राहणार
या विलीनीकरणानंतर फक्त एकच कंपनी शेअर बाजारात लिस्टेड राहील, ज्याचे नाव IDFC First Bank असेल. सप्टेंबर 2023 च्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तक म्हणजेच IDFC फायनान्शियल होल्डिंगकडे या बँकेत 39.37% हिस्सा आहे.

कोणत्या योजनेअंतर्गत शेअर्सचे वाटप केले जाईल?
IDFC Ltd च्या 100 शेअर्सऐवजी आता गुंतवणूकदारांना IDFC फर्स्ट बँकेचे 155 शेअर्स मिळतील. या योजनेच्या मदतीने IDFC बँकेचे शेअर्स 10% सवलतीवर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही ही युक्ती वापरू शकता.

IDFC फर्स्ट बँकेचे शेअर 10% सवलतीवर उपलब्ध 
सध्या IDFC लिमिटेडचा शेअर 125 रुपयांच्या पातळीवर आहे. 100 शेअर्सचे मूल्य 12500 रुपये होते. विलीनीकरणानंतर तुम्हाला IDFC फर्स्ट बँकेचे 155 शेअर्स मिळतील. याचा अर्थ, तुम्हाला IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स 80.65 रुपयांच्या किमतीत मिळत आहेत. सध्या या शेअरची किंमत 89 रुपये आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुमारे 10 टक्के सवलत मिळत आहे. या दोन्ही शेअर्सनी 2023 मध्ये जोरदार परतावा दिला आहे.

(टीप-शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Buy IDFC First Bank share at 10% discount, RBI approves reverse merger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.