Lokmat Money > बिझनेस न्यूज > Buy now Pay Later : पोस्ट पे किंवा पे लेटरचा वापर करत असाल तर व्हा सावध! एक छोटी चूक आणि बसेल मोठा फटका

Buy now Pay Later : पोस्ट पे किंवा पे लेटरचा वापर करत असाल तर व्हा सावध! एक छोटी चूक आणि बसेल मोठा फटका

तुम्हाला शॉपिंगसाठी काही क्रेडिट लिमिट दिलं जातं, ज्याच्या मदतीनं तुम्ही पैसे नसतानाही ऑनलाइन ऑर्डर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 01:15 PM2023-04-18T13:15:18+5:302023-04-18T13:15:47+5:30

तुम्हाला शॉपिंगसाठी काही क्रेडिट लिमिट दिलं जातं, ज्याच्या मदतीनं तुम्ही पैसे नसतानाही ऑनलाइन ऑर्डर करू शकता.

Buy now Pay Later Be careful if you are using post pay or pay letter A small mistake and a big hit online shopping amazon flipkart | Buy now Pay Later : पोस्ट पे किंवा पे लेटरचा वापर करत असाल तर व्हा सावध! एक छोटी चूक आणि बसेल मोठा फटका

Buy now Pay Later : पोस्ट पे किंवा पे लेटरचा वापर करत असाल तर व्हा सावध! एक छोटी चूक आणि बसेल मोठा फटका

आजकाल ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम सारख्या ऑनलाइन पेमेंट आणि शॉपिंग सुविधा प्रदान करणारे ॲप्स देखील आपल्याला पे लेटरची सुविधा देतात. याद्वारे तुम्हाला शॉपिंगसाठी काही क्रेडिट लिमिट दिलं जातं, ज्याच्या मदतीनं तुम्ही पैसे नसतानाही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. त्याच वेळी, पुढील महिन्यात बिल जनरेट झाल्यानंतर तुम्हाला ते भरावं लागेल. या सुविधेचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत.

जर तुम्ही या पेमेंट सुविधेचा वापर करत असाल तर तुम्हाला त्यांच्या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही देय तारखेपूर्वी बिल भरलं नाही तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावं लागू शकते. पे लेटर वापरताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊ.

गरज नसतानाही सामान खरेदी
अनेक वेळा तुम्हाला पे लेटर अकाउंटद्वारे ऑनलाइन शॉपिंगसाठी पैसे भरण्यासाठी सूट आणि कॅशबॅक ऑफर दिल्या जातात. त्यातून खरेदी करताना लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे तुम्ही अनावश्यक वस्तू खरेदी करता. अशा प्रकारे ही तुमची सवय बनते आणि ऑनलाइन शॉपिंगवर तुमचं नियंत्रण नसतं. यामुळे तुम्हाला नंतर बिल भरण्यात अडचण येऊ शकते.

मोठा दंड
तुम्हाला पे लेटर बिल भरण्यास उशीर झाल्यास, तुमच्या बिलाच्या रकमेत मोठा दंड जोडला जातो. दुसरीकडे, अधिक विलंब झाल्यास दंडाची रक्कम वाढत जाते. अशा प्रकारे तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढू लागतो आणि ते फेडणं तुम्हाला जड होतं. अशा परिस्थितीत, हे टाळण्याचा तुमच्यासाठी सोपा मार्ग म्हणजे गरज असेल तेव्हाच या सुविधांचा वापर करा आणि वेळेवर बिल भरा.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम
पे लेटर बिल भरण्यास विलंब झाल्यास मोठा दंड भरावा लागतो. तसेच, त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होतो. बिल भरण्यास विलंब झाल्यास, पे लेटर सुविधा देणाऱ्या वित्तीय संस्थेद्वारे क्रेडिट ब्युरोला निगेटिव्ह रिपोर्ट दिला जातो. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. तो पुन्हा चांगला व्हावा यासाठी दीर्घ कालावधी जातो. खराब क्रेडिट स्कोअरसह, तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कर्ज मंजूर करणं कठीण होऊ शकतं.

Web Title: Buy now Pay Later Be careful if you are using post pay or pay letter A small mistake and a big hit online shopping amazon flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.