Lokmat Money > बिझनेस न्यूज > "रेडमी नोट 4" खरेदी करा केवळ 1 रुपयात

"रेडमी नोट 4" खरेदी करा केवळ 1 रुपयात

चीनची स्मार्टफोन निर्माती शाओमी कंपनीचा रेडमी नोट 4 हा फोन आता केवळ 1 रूपयात खरेदी करण्याची संधी

By admin | Published: April 3, 2017 04:12 PM2017-04-03T16:12:57+5:302017-04-03T16:19:05+5:30

चीनची स्मार्टफोन निर्माती शाओमी कंपनीचा रेडमी नोट 4 हा फोन आता केवळ 1 रूपयात खरेदी करण्याची संधी

Buy "Redmi Note 4" in only 1 rupee | "रेडमी नोट 4" खरेदी करा केवळ 1 रुपयात

"रेडमी नोट 4" खरेदी करा केवळ 1 रुपयात

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - चीनची स्मार्टफोन निर्माती शाओमी या कंपनीचा रेडमी नोट 4 हा फोन आता केवळ 1 रूपयात खरेदी करण्याची संधी आहे. शाओमीने येत्या बुधवारी भारतात Mi Fan Festivalचं आयोजन केलं आहे. हा एक रूपयाचा फ्लॅश सेल असून सेलमध्ये भाग घेण्यासाठी शाओमीचं अॅप असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे शाओमीचं अॅप नाही ते या सेलमध्ये सहभागी होऊ शकत नाही. 
 
बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा सेल असणार आहे. यामध्ये रेडमी नोट 4, Mi बँड 2 आणि 10000 एमएएच पॉवरबँक आदी उपकरणं केवळ एका रुपयात खरेदी करता येणार आहे.  
 
याशिवाय आजपासून (दि. 3) ते 5 एप्रिल दरम्यान सकाळी 10 वाजेपासून 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट कूपन देखील मिळणार आहे. तसंच एसबीआयचं डेबिट कार्ड असणा-यांना 5,000 किंवा त्याच्या वरच्या खरेदीवर 5 टक्के सूट मिळेल.
या व्यतिरिक्त 5 एप्रिलला दुपारी 12 वाजता शाओमी रेडमी नोट 4चा नॉर्मल सेल सुरू होणार आहे. तसेच  शाओमी Mi मॅक्स प्राइम स्मार्टफोन 19,999 रुपयात उपलब्ध असणार आहे.  
 

Web Title: Buy "Redmi Note 4" in only 1 rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.