Lokmat Money > बिझनेस न्यूज > Buy, Sell or Hold Zomato: लॉक इन पिरिअड संपला, Zomato चे शेअर्स तोंडावर आपटले

Buy, Sell or Hold Zomato: लॉक इन पिरिअड संपला, Zomato चे शेअर्स तोंडावर आपटले

Zomato Share Price Today: सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झोमॅटोचे शेअर्स तोंडावर आपटल्याचं दिसून आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:19 AM2022-07-25T11:19:24+5:302022-07-25T11:21:02+5:30

Zomato Share Price Today: सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झोमॅटोचे शेअर्स तोंडावर आपटल्याचं दिसून आलं.

Buy Sell or Hold Lock in period ends shares of Zomato down by more than 13 percent bse nse stock market | Buy, Sell or Hold Zomato: लॉक इन पिरिअड संपला, Zomato चे शेअर्स तोंडावर आपटले

Buy, Sell or Hold Zomato: लॉक इन पिरिअड संपला, Zomato चे शेअर्स तोंडावर आपटले

झोमॅटोच्या ७८ टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी संपताच, आज (सोमवारी) या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. शेअर्सच्या झालेल्या मोठ्या विक्रीमुळे आज Zomato चे शेअर १३ टक्क्यांहून अधिक घसरले. कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात झोमॅटोचे शेअर्स NSE वर १३.८९ टक्क्यांच्या घसरणीसह ४६.२० रूपयांवर ट्रेड करत करत होते.

लॉक-इन कालावधी ठराविक गुंतवणूकदारांसाठी असतो. जेव्हा जेव्हा स्टॉकच्या मोठ्या टक्क्याचे लॉक-इन संपते तेव्हा ते गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकतात. लॉक-इन कालावधीपूर्वी ते त्यांचे शेअर्स विकू शकत नाहीत. अशा स्थितीत जर गुंतवणूकदारांनी तो शेअर विकायला सुरुवात केली तर त्याच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. पण गुंतवणूकदारांनी शेअर्स विकलेच पाहिजेत असे नाही. गेल्या तीन महिन्यांत या शेअरच्या किंमतीत ३३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६८.६५ रुपये आहे.

खरेदी करावे, विकावे की होल्ड करावे?

  • Refinitiv नुसार झोमॅटोच्या शेअर्ससाठी १७ अॅनालिसिस्टद्वारे सरासरी खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • ६ विश्लेषकांनी स्ट्रॉंग बायचा सल्ला दिला आहे.
  • ७ विश्लेषकांनी खरेदीचा सल्ला दिलाय.
  • २ विश्लेषकांनी शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
  • तर २ विश्लेषकांनी शेअर्सच्या विक्रीचा सल्ला दिला आहे.
     

२३ जुलै २०२१ रोजी झोमॅटोचे शेअर्स शेअर बाजारावर लिस्ट करण्यात आले होते. आयपीओतील गुंतवणूकदारांना हे शेअर्स ७६ रूपये प्रति शेअर दरानं मिळाले होतं.तर बीएसईवर हे शेअर ११५ रूपयांवर लिस्ट झाले होते.

Web Title: Buy Sell or Hold Lock in period ends shares of Zomato down by more than 13 percent bse nse stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.