मुंबई : अमेरिकेची रोजगारविषयक आकडेवारी जाहीर होण्याच्या आधी शुक्रवारी शेअर बाजारात सावधानतेचे वातावरण दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले. घसरणीचा हा सलग तिसरा दिवस होता.
दरम्यान, शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स १९५.१८ अंकांनी अथवा 0.७0 टक्क्यांनी वाढला. निफ्टीही८६.४५ अंकांनी अथवा १ टक्क्याने वर चढला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ४५.0७ अंकांनी अथवा 0.१६ टक्क्यांनी वाढून २८,0६१.१४ अंकांवर बंद झाला. तत्पूर्वीच्या दोन सत्रांत सेन्सेक्स २२८.३४ अंकांनी घसरला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ११.९५ अंकांनी अथवा 0.१४ टक्क्यांनी घसरून ८,६९७.६0 अंकांवर बंद झाला.
एशियन पेंट्स, सिप्ला, इन्फोसिस, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचे समभाग घसरले. सेन्सेक्समधील ३0 पैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले. ११ कंपन्यांचे समभाग वाढले. टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक वाढले. व्यापक बाजारांत संमिश्र कल पहायला मिळाला. बीएसई स्मॉलकॅप 0.0२ टक्क्यांनी घसरला, तर मीडकॅप 0.0१ टक्क्यांनी वाढला.
आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळाली. हाँगकाँग, जपान आणि सिंगापूर येथील बाजारत 0.४२ टक्क्यांपर्यंत घसरले. चीनमधील बाजार राष्ट्रीय दिनाच्या सुटीनिमित्त बंद होते. युरोपात सकाळी घसरण दिसून आली. फ्रान्स आणि जर्मनी येथील बाजार 0.२१ टक्क्यांपर्यंत घसरण दर्शवित होते. (प्रतिनिधी)
>सोने आणखी १७0 रुपयांनी घसरले
सराफा बाजारात घसरण सुरूच असून, राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोने १७0 रुपयांनी घसरून ३0,३२0 रुपये तोळा झाले.
बाजारातील घसरणीचा हा सलग तिसरा दिवस होता. चांदीही ९२0 रुपयांनी घसरून ४१,९३0 रुपये किलो झाली. जागतिक बाजारातील नरमाई आणि ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी याचा फटका बसला.
खरेदीदार सावध; सेन्सेक्स आणखी घसरला
अमेरिकेची रोजगारविषयक आकडेवारी जाहीर होण्याच्या आधी शुक्रवारी शेअर बाजारात सावधानतेचे वातावरण दिसून आले.
By admin | Published: October 8, 2016 03:53 AM2016-10-08T03:53:46+5:302016-10-08T03:53:46+5:30