Join us

खरेदीदार-विक्रेत्यांचे ‘रक्षाबंधन’; वाचा कृष्णार्जुनाचे कथन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 8:11 AM

कृष्णा, सध्या सणाचा माहोल आहे, कालच रक्षाबंधन झाले, परंतु जीएसटीमध्ये करदाता कशाप्रकारे आणि केव्हा रक्षाबंधन साजरे करेल?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सध्या सणाचा माहोल आहे, कालच रक्षाबंधन झाले, परंतु जीएसटीमध्ये करदाता कशाप्रकारे आणि केव्हा रक्षाबंधन साजरे करेल? इनपुट टॅक्स क्रेडीट २ए नुसार जुळवणी, आऊटपुट टॅक्सची जुळवणी जीएटीआर-3बी, जीएसटीआर-१ व ई-वे बिल नुसार वही खात्याशी जुळते अथवा नाही हे पाहणे, असे बरेच कधी, कसे होणार?

कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुन, रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते व त्याबदल्यात तिच्या संरक्षणाचे वचन भाऊ तिला देतो. त्याप्रमाणे जीएसटीमध्ये विक्री / खरेदीसंबंधित जुळणारे व न जुळणारे बंध हे इनपुट टॅक्स क्रेडिट संबंधित पुरवठादाराच्या (भाऊ) व प्राप्तीदाराच्या (बहीण) वचनपूर्तीसाठी आवश्यक आहेत. जीएसटीआर-२ए शी खरेदी जुळवून घेणे व जीएसटीआर-३बी, जीएसटीआर-१ व ई-वे बिल विक्रीशी जुळवून घेणे महत्त्वाचे !

अर्जुन :  जीएसटीमध्ये जीएसटी विभागाकडून एएसएमटी-१०च्या नोटीस नुसार  करदाता स्वत:चे कशाप्रकारे रक्षण करू शकेल? कृष्ण :  जीएसटी विभागाकडून दिलेल्या एकूण १५ पॅरामीटरप्रमाणे तंतोतंत माहिती जीएसटी विभागाला पुरविली तरच करदात्याचे रक्षण होईल.

अर्जुन : जीएसटी विभागाकडून आलेल्या नोटिसासंबंधी माहिती न पुरविल्यास  एएसएमटी-११ नुसार करदात्याच्या दिलेल्या उत्तराला समाधान झाले नाही तर करदात्याचे रक्षण होणार नाही, बरोबर?कृष्ण :  एएसएमटी-११ नुसार करदात्याने दिलेल्या उत्तराने समाधान झाले नसल्यास किंवा विसंगती असल्यास जीएसटी विभागाकडून पुढील कारवाईसाठी नोटीस बजावण्यात येईल व करदात्यास भुर्दंड बसू शकेल.

अर्जुन : करदात्यांनी जीएसटी विभागाकडून आलेल्या नोटिसांच्या बाबतीत नेमके काय करावे? कृष्ण : जीएसटी विभागाकडून  नोटिसा येण्याच्या अगोदरच खरेदीदार व विक्रेता यांनी भाऊ व बहीण या नात्याप्रमाणे सर्व इनपुटसंबंधी माहिती जीएसटीआर-२ए व आऊटपुटसंबंधी माहिती जीएसटीआर-३बीमध्ये तंतोतंत देऊन जीएसटीआर-१ व ई-वे बिल जुळवून घ्यावे. म्हणजेच खरेदीदार व विक्रेत्याचे नाते भाऊ-बहिणीसारखे संबंध टिकवून ठेवू शकेल.

टॅग्स :जीएसटी