Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या वर्षात महागणार कपडे आणि जोडे खरेदी; जीएसटी होणार १२ टक्के

नव्या वर्षात महागणार कपडे आणि जोडे खरेदी; जीएसटी होणार १२ टक्के

नवा दर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालावर लागू हाेणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 08:58 AM2021-12-25T08:58:22+5:302021-12-25T08:59:00+5:30

नवा दर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालावर लागू हाेणार आहे.

buying expensive clothes and shoes in the new year gst will be 12 percent | नव्या वर्षात महागणार कपडे आणि जोडे खरेदी; जीएसटी होणार १२ टक्के

नव्या वर्षात महागणार कपडे आणि जोडे खरेदी; जीएसटी होणार १२ टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सज्ज आहे. येणारे वर्ष आनंददायी ठरावे, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र नवे वर्ष महागाई घेऊन येणार आहे. सरकारने कपडे आणि फूटवेअरवरील जीएसटीमध्ये वाढ केली आहे. नवा दर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालावर लागू हाेणार आहे. त्यामुळे तयार कपडे, जाेडे आणि चपलांच्या किमती वाढणार आहेत.

सप्टेंबरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली हाेती. त्यात काही वस्तूंवरील जीएसटीचा दर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. १ जानेवारी २०२२ पासून नवे दर लागू हाेणार आहेत. त्यानुसार, १ हजार रुपयांहून कमी किमतीच्या कपड्यांवरील जीएसटीचा दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. जाेड्यांवरही हाच दर लागू हाेणार आहे. याशिवाय शिवलेल्या कपड्यांसह हातमागावर विणलेले कपडेही महाग हाेणार आहेत. शिलाईसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या धाग्यांवरही जीएसटी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तयार कपड्यांसाेबतच आता कपडे शिवणेही महागणार आहे. याचा गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या बजेटवर निश्चितच परिणाम हाेणार आहे.
 

Web Title: buying expensive clothes and shoes in the new year gst will be 12 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी