Join us

नव्या वर्षात महागणार कपडे आणि जोडे खरेदी; जीएसटी होणार १२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 8:58 AM

नवा दर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालावर लागू हाेणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सज्ज आहे. येणारे वर्ष आनंददायी ठरावे, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र नवे वर्ष महागाई घेऊन येणार आहे. सरकारने कपडे आणि फूटवेअरवरील जीएसटीमध्ये वाढ केली आहे. नवा दर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मालावर लागू हाेणार आहे. त्यामुळे तयार कपडे, जाेडे आणि चपलांच्या किमती वाढणार आहेत.

सप्टेंबरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली हाेती. त्यात काही वस्तूंवरील जीएसटीचा दर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. १ जानेवारी २०२२ पासून नवे दर लागू हाेणार आहेत. त्यानुसार, १ हजार रुपयांहून कमी किमतीच्या कपड्यांवरील जीएसटीचा दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. जाेड्यांवरही हाच दर लागू हाेणार आहे. याशिवाय शिवलेल्या कपड्यांसह हातमागावर विणलेले कपडेही महाग हाेणार आहेत. शिलाईसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या धाग्यांवरही जीएसटी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तयार कपड्यांसाेबतच आता कपडे शिवणेही महागणार आहे. याचा गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या बजेटवर निश्चितच परिणाम हाेणार आहे. 

टॅग्स :जीएसटी