Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुन्या इलेक्ट्रिक अन् छोट्या कार खरेदी करणे महागणार; GST १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला

जुन्या इलेक्ट्रिक अन् छोट्या कार खरेदी करणे महागणार; GST १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला

आता जुन्या कार खरेदी करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारने जीएसटीमध्ये मोठा बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 09:42 IST2024-12-22T09:30:48+5:302024-12-22T09:42:18+5:30

आता जुन्या कार खरेदी करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारने जीएसटीमध्ये मोठा बदल केला आहे.

Buying old electric and small cars will become expensive GST increased from 12 percent to 18 percent | जुन्या इलेक्ट्रिक अन् छोट्या कार खरेदी करणे महागणार; GST १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला

जुन्या इलेक्ट्रिक अन् छोट्या कार खरेदी करणे महागणार; GST १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला

जुन्या कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. काल जीएसटीची बैठक झाली, या बैठकीत जुन्या कार खरेदीवरील जीएसटीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलने आता जुन्या छोट्या कार  आणि जुन्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीवर १२ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नोंदणीकृत विक्रेत्यांकडून वापरलेल्या कार खरेदी करणे आगामी काळात महाग होणार आहेत. 

पॉपकॉर्नच्या 'जीएसटी'मुळे वाढणार किंमती; आता किती द्यावे लागणार पैसे?

वैयक्तिक कार खरेदी किंवा विक्रीवर कोणताही जीएसटी लागणार नाही. हा जीएसटी जुन्या वाहनाच्या एकूण मूल्याऐवजी नोंदणीकृत विक्रेत्याच्या मार्जिनवर लावला जाईल. याव्यतिरिक्त, निर्धारित वेळेत थकबाकी किंवा मासिक हप्ते भरण्यात अयशस्वी असेल कर परिषदेने दंडात्मक शुल्कावरील जीएसटी काढून टाकला आहे.

जैसलमेरमध्ये झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या निर्णयामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कौन्सिलच्या निर्णयानुसार आता कॅरामल मिसळलेल्या गोड पॉपकॉर्नवर १८ टक्के जीएसटी लागणार आहे. 

जर उर्वरित खारट पॉपकॉर्न लेबलांनी भरलेले असतील तर त्यांना पूर्वीप्रमाणे १२ टक्के जीएसटी लागू होईल आणि लेबल नसलेल्यांवर पाच टक्के जीएसटी लागू होईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, छोट्या कंपन्यांची नोंदणी सुलभ करण्यासाठी संपूर्ण तपशील तयार करण्यात आला असून त्याला परिषदेने तत्वतः मान्यता दिली आहे.

आणखी महत्वाचे निर्णय

गरिबांना दिल्या जाणाऱ्या फोर्टिफाइड तांदळावरील कर १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला.

विविध प्रकारच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी जीन थेरपी पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्यात आली आहे.

दुर्बल घटकांना मोफत दिल्या जाणाऱ्या अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर पाच टक्के कर कायम राहील.

Web Title: Buying old electric and small cars will become expensive GST increased from 12 percent to 18 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.