Join us

सर्वाधिक तोटा झालेलं स्टार्टअप ठरलं Byju's, आकडा पोहोचला ८२४५ कोटी रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 10:44 AM

एकेकाळी देशातील सर्वात व्हॅल्युएबल स्टार्टअप म्हणून ओळखलं जाणारं बायजूस आता संकटांनी वेढलेलं दिसत आहे.

एकेकाळी देशातील सर्वात व्हॅल्युएबल स्टार्टअप म्हणून ओळखलं जाणारं बायजूस आता संकटांनी वेढलेलं दिसत आहे. एडटेक कंपनीचा तोटा झपाट्यानं वाढत आहे. २०२२ या आर्थिक वर्षात बायजूला ८२४५ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. सध्या, हे केवळ सर्वाधिक तोटा झालेलं स्टार्टअपच बनलं नाही, तर देशातील सर्वाधिक तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांमध्येही सामील झाली आहे.ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम ऑपरेटर व्होडाफोन आयडियानं (Vodafone Idea) आर्थिक वर्ष २०२२ मध्ये सर्वाधिक २८२४५ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. यानंतर टाटा मोटर्सला (Tata Motors) मोठा तोटा झाला होता. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या कार उत्पादक कंपनीचा निव्वळ तोटा ११४४१ कोटी रुपयांचा होता. टाटा मोटर्सनं आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २४२४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. पण, व्होडाफोन आयडिया आर्थिक वर्ष २०२३ मध्ये तोट्याच्या दलदलीत आणखी अडकली. या कालावधीत कंपनीचा तोटा १०५६ कोटी रुपयांनी वाढला आहे.या कंपन्यांना सर्वाधिक नुकसान

  • व्होडाफोन आयडिया - २८२४५ कोटी रुपये
  • टाटा मोटर्स - ११४४१ कोटी रुपये
  • बायजूस - ८२४५ कोटी रुपये
  • रिलायन्स कॅपिटल - ८११६ कोटी रुपये
  • रिलायन्स कम्युनिकेशन्स – ६६२० कोटी रुपये

व्हाईटहॅट ज्युनिअर आणि ओस्मोला ठरवलं जबाबदार बायजूने मंगळवारी २२ महिन्यांच्या विलंबानंतर आर्थिक वर्षासाठी आपली आर्थिक स्थिती जाहीर केली. रिपोर्टनुसार, गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल दुपटीनं वाढून ५२९८ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल २४२८ कोटी रुपये होता. पण कंपनीचा तोटाही जवळपास दुप्पट झाला. या विक्रमी तोट्यासाठी व्हाईटहॅट ज्युनियर (Whitehat Junior) आणि ओस्मो (Osmo) यांना जबाबदार धरण्यात आलं आहे.तोट्यात नव्या व्यवसायाचं योगदान ३८०० कोटीबायजूच्या मते, एकूण तोट्यात नवीन व्यवसायाचा वाटा ४५ टक्के किंवा ३८०० कोटी रुपये होता. आर्थिक खर्च देखील आर्थिक वर्ष २०२२ मध्ये वाढून ५१९ कोटी रुपये झाला. वर्षभरापूर्वी हा आकडा ६२ कोटी रुपये होता. नुकसानाव्यतिरिक्त, कंपनीला Byju च्या Alpha Inc ने घेतलेल्या १.२ अब्ज डॉलर्सच्या टर्म लोनबाबत काही खटल्यांचा सामना करावा लागत आहे. ही एक स्टेप डाउन सब्सिडायरी आहे, ज्याचा गॅरंटर बायजूस आहे.भविष्याबाबत चिंताऑडिटरनं आपल्या रिपोर्टमध्ये नमूद केलंय की, या परिस्थितीमुळे कंपनीच्या भविष्यावर चिंतेचे ढग आहेत. त्याच्या ऑपरेशनल शक्यता देखील चिंताजनक स्थितीत आहेत. बिघडलेल्या आर्थिक स्थितीचा कंपनीच्या बाजारमूल्यावरही विपरीत परिणाम झाला आहे. आकडेवारीनुसार, सध्या बायजूसचं बाजारमूल्य १ अब्ज डॉलर्स राहिलं आहे. एप्रिल २०२३ मध्ये हा आकडा अंदाजे २२ अब्ज डॉलर्स होता.

टॅग्स :व्यवसायटाटाव्होडाफोन आयडिया (व्ही)