Lokmat Money > बिझनेस न्यूज > Byju तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढणार, कंपनीनं सांगितला पुढचा प्लॅन!

Byju तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढणार, कंपनीनं सांगितला पुढचा प्लॅन!

बायजूच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी परदेशात ब्रँड स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण 10,000 शिक्षकांना नियुक्त करण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 09:18 PM2022-10-12T21:18:15+5:302022-10-12T21:18:47+5:30

बायजूच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी परदेशात ब्रँड स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण 10,000 शिक्षकांना नियुक्त करण्यात येणार आहे.

byju sack up 2500 employees next six months the company said the next plan | Byju तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढणार, कंपनीनं सांगितला पुढचा प्लॅन!

Byju तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढणार, कंपनीनं सांगितला पुढचा प्लॅन!

दिग्गज कंपनी Byju मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची छाटणी करण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील सहा महिन्यांत 5 टक्के कार्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढण्याची तयारी आहे. ही कर्मचारी कपात टेक्नॉलॉजीसह अनेक विभागांत होईल. महत्वाचे म्हणजे सध्या Byju मध्ये 50 हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. 

10 हजार शिक्षकांची भरती - 
बायजूच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी परदेशात ब्रँड स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण 10,000 शिक्षकांना नियुक्त करण्यात येणार आहे. 

याशिवाय, संपूर्ण भारतात त्यांचे 200 हून अधिक सक्रिय केंद्र आहेत. या वर्षाच्या अखेर पर्यंत यांची संख्या 500 केंद्रांव नेण्याचे लक्ष्य आहे, असा दावाही कंपनीने केला आहे.

कंपनीला झालाय मोठा घाटा - 
गेल्या आर्थिक वर्षात Byju ला प्रचंड मोठा घाटा झाला आहे. कंपनीना तब्बल 4,588 कोटी रुपयांचा घाटा झाल्याचे समजते. जो आधीच्या एकावर्षाच्या तुलनेत तब्बल 19 पट अधिक आहे. एवढेच नाही, तर कंपनीच्या महसुलातही घट झाली आहे.
 
Web Title: byju sack up 2500 employees next six months the company said the next plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.