बाईटडान्स लिमिटेड TikTok India चे भारतातील असेट्स आपली स्पर्धक कंपनी ग्लेन्सला विकण्यासंदर्भात चर्चा करत आहे. बाईटडान्स शॉर्ट व्हिडीओ शेअररिंग अॅप टिकटॉकला वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. टिकटॉकवर भारतात अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. TikTok India च्या असेट्ससाठी जपानच्या सॉफ्टबँक ग्रुपकॉर्पोरेशन कांग्लामेरेटशी चर्चाही सुरू केली आहे.
सॉफ्टबँकची ग्लेन्सच्या पेरेंट कंपनी InMobi Pte आणि टिकटॉकची पेरेंट कंपनी बाईटडान्समध्ये हिस्सा आहे. सॉफ्टबँक आणि बाईटडान्सनं यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. याव्यतिरिक्त ग्लेन्सच्या प्रवक्त्यांनीही यासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. सॉफ्टबँक, बाईटडान्स आणि ग्लेन्सदरम्यान सध्या चर्चा सुरू असून जर हा व्यवहार पूर्ण झाला तर त्याला भारतातूनही मंजुरी मिळणं आवश्यक आहे. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यानचे संबंधं कमालीचे ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं काही चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये TikTok या अॅपचाही समावेश होते. सध्या कंपनीचे देशातील असेट्स विकण्यासाठी कंपनी भारतातीलच कंपनीच्या शोधात आहे.
जर यासंदर्भातील व्यवहाराबाबात चर्चा झाली तर भारत सरकार TikTok च्या भारतीय युझरचा डेटा आणि तंत्रज्ञान भारतातच ठेवण्याचे आदेश देण्याची शक्यता असल्याचं या प्रकरणाच्या एका जाणकारानं सांगितलं. भारत आणि चीनदरम्यान तणाव अद्यापही कायम आहे आमि भारत चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना भारतात येण्यासाठी मंजुरी देणार नाही. याव्यतिरिक्त तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर चीनच्या नव्या नियमांमुळेही या व्यवहारात समस्या निर्माण होऊ शकतात. कारण या व्यवहारासाठी त्यांना चीनच्या अथॉरिटिचीही परवानगी घ्यावी लागणार असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
कर्मचाऱ्यांची कपात
टिकटॉकवरील बंदीनंतर कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे आपली टीम कमी केली जाणार असल्याचं सांगण्यास सुरूवात केली होती. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना एक ईमेल करण्यात आला. तसंच केवळ महत्त्वपूर्ण पदांवरील कर्मचारीच कायम राहणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं होतं. बाईटडान्सचे अंतरिम जागतिक प्रमुख वॅनेसा पाप्पस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावानं आपली टीम छोटी केली जाणार असल्याचं सांगितलं होतं. "जसं तुम्ही कल्पना करू शकता तसा सहजरित्या हा निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण टीम कोणालाही कंपनी सोडावी लागू नये यासाठी पूर्ण प्रयत्न करत होती. आम्ही आपले खर्चही कमी केले आणि बेनिफिट्सही सुरू ठेवले. सध्या आपले अॅप बंद आहेत. अशा परिस्थितीत आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकत नाही," असंही त्यांनी नमूद आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं.
ग्लेन्सची प्रसिद्धी वाढली
टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर ग्लेन्स ची प्रसिद्धी वाढली आहे. ग्लेन्स डिजिटल एक्सपिरिअन्स एक मोबाईल कंटेन्ट प्लॅटफॉर्म आहे जो हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या नवीन तिवारी यांनी सुरू केला. ते इनमोबीचे फाऊंडर आहेत जे देशातील पहिला युनिकॉर्न आहे. टिकटॉकनर बंदी घातल्यानंतर ग्लेन्सचा शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म Roposo मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं होतं. टिकटॉक वर बंदी घातली गेल्यानंतर देशात अनेक नवे शॉर्ट व्हिडीओ अॅपही तयार झाले.
Tiktok India च्या असेट्सची होणार विक्री?, ByteDance ची 'या' भारतीय कंपनीशी चर्चा
Tiktok या अॅपवर केंद्र सरकारनं घातली आहे अनिश्चित काळासाठी बंदी. अॅपवरील बंदीनंतर कंपनीनं सुरू केली होती कर्मचाऱ्यांची कपात.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 09:13 PM2021-02-13T21:13:29+5:302021-02-13T21:15:01+5:30
Tiktok या अॅपवर केंद्र सरकारनं घातली आहे अनिश्चित काळासाठी बंदी. अॅपवरील बंदीनंतर कंपनीनं सुरू केली होती कर्मचाऱ्यांची कपात.
HighlightsTiktok या अॅपवर केंद्र सरकारनं घातली आहे अनिश्चित काळासाठी बंदीअॅपवरील बंदीनंतर कंपनीनं सुरू केली होती कर्मचाऱ्यांची कपात.