Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA in Defence Sector: हवाईदलासाठी TATA, Airbus डिफेन्ससोबत एअरक्राफ्ट बनवणार; रतन टाटा म्हणाले...

TATA in Defence Sector: हवाईदलासाठी TATA, Airbus डिफेन्ससोबत एअरक्राफ्ट बनवणार; रतन टाटा म्हणाले...

C-295 aircraft manufacturing in India: सी-295 विमानं हवाई दलाच्या कालबाह्य झालेल्या एवरो-748 विमानांची जागा घेतील. पुढील 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळतील. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:23 PM2021-09-24T18:23:12+5:302021-09-24T18:23:47+5:30

C-295 aircraft manufacturing in India: सी-295 विमानं हवाई दलाच्या कालबाह्य झालेल्या एवरो-748 विमानांची जागा घेतील. पुढील 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळतील. 

c 295 aircraft manufacturing in india got clearance to dta advance systems airbus defense project ratan tata congratulate | TATA in Defence Sector: हवाईदलासाठी TATA, Airbus डिफेन्ससोबत एअरक्राफ्ट बनवणार; रतन टाटा म्हणाले...

TATA in Defence Sector: हवाईदलासाठी TATA, Airbus डिफेन्ससोबत एअरक्राफ्ट बनवणार; रतन टाटा म्हणाले...

Highlightsसी-295 विमानं हवाई दलाच्या कालबाह्य झालेल्या एवरो-748 विमानांची जागा घेतील.

संरक्षण मंत्रालयाने ‘सी-295’ या 56 मालवाहतूक विमानांच्या खरेदीसाठी स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत जवळपास 22000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. संरक्षणावरील कॅबिनेट कमिटीने यासाठी नुकताच हिरवा झेंडा दाखविला होता. महत्त्वाचे म्हणजे ही विमाने भारतात बनवण्यात येणार असून टाटा अॅडव्हान्स सोबत मिळून एअरबस या विमानांचे उत्पादन करणार आहे. राफेलनंतर ही दुसरी मोठी डील आहे जी भारतीय कंपनीसोबत मिळून केली जाणार आहे. (Govt seals mega deal with Airbus for purchase of 56 C-295 military transport aircraft. ) दरम्यान, यानंतर टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला. तसंच त्यांनी दोन्ही व्हेन्चर्सचं अभिनंदन केलं. 

"C-295 ही विमानं तयार करण्यासाठी टाटा अॅडव्हान्स सिस्टम आणि एअरबस डिफेन्सच्या जॉईंट व्हेन्चर्सच्या प्रोजेक्टला क्लिअरन्स मिळणं हे मोठं पाऊल आहे. यामुळे भारतात एव्हिएशन आणि एव्हिएशनशी निगडीत प्रकल्पांचे दरवाजे उघडतील. C-295 हे विमान मल्टिरोल विमान असेल, जे मोहिमेच्या आवश्यकतेनुसार अनेक डिव्हाईस आणि अत्यावश्यक गोष्टींसह असेल. ही मंजुरी भारतात पूर्णपणे विमान निर्मितीला प्रतिबिंबित करते," असं रतन टाटा म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

 
मोठ्या प्रमाणात रोजगार
या डीलमुळे येत्या काही वर्षांत भारतात 6000 हून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच देशात हवाई क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान येणार आहे. संरक्षण मंत्रालयानुसार हा एकप्रकारचा पहिलाच असा प्रकल्प आहे ज्यामध्ये खासगी कंपनी लष्करासाठी विमान बनवणार आहे. आतापर्यंत हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडकडे (HAL) ही जबाबदारी होती. आता पहिल्यांदा खासगी कंपनी लष्करासाठी लष्करी विमाने बनविणार आहे. 

या डीलनुसार 16 विमाने एअरबस डिफेन्स स्पेनवरून आयात केले जाणार आहेत. अन्य विमाने टाटाच्या प्रकल्पात पुढील १० वर्षांत बनविण्यात येणार आहेत. यासाठी हैदराबाद आणि बंगळूरूच्या आसपास जागा शोधण्यात येत आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्येदेखील प्रकल्प उभा करता येऊ शकतो. देशात 2012 पासून C295MW ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टच्या दिशेने काम सुरु आहे. यंदा त्याचा प्रस्ताव सीसीएसकडे पाठविण्यात आला होता. 

Web Title: c 295 aircraft manufacturing in india got clearance to dta advance systems airbus defense project ratan tata congratulate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.