सर्वात प्रतिष्ठित समजले जाणारे 'टाइम' या आंतरराष्ट्रीय मासिकाने यंदा 100 सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. ज्याचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे ते म्हणजे बिल्किस दादी (Bilkis Dadi). नागरिकत्व सुधारणा अधिनियम(सीएए) च्या विरोधात 82 वर्षीय बिल्किस दादी दिल्लीच्या शाहीन बाग भागात कित्येक दिवस उपोषणाला बसल्यानं चर्चेत आली होती. टाइम मासिकाने बिल्किस दादीला एक आयकॉन म्हटले आहे. बिल्किस दादी यांना शाहीन बागची दादी म्हणूनही ओळखले जाते.गेल्या वर्षी मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर केला, त्यानंतर देशभरात निदर्शने करण्यात आली. पण शाहीन बागमधली आजींची कामगिरी ही या संपूर्ण चळवळीची वैशिष्ट्य ठरली. दिल्लीच्या शाहीन बाग चळवळीत धरणे आंदोलनाला बसून जेव्हा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दादींनी रणशिंग फुंकले, तेव्हा 82 वर्षीय बिल्किस दादी चर्चेत आल्या.शाहीन बागेच्या आंदोलनात मध्यस्ती करणाऱ्यांना दिलं चोख प्रत्युत्तरशाहीन बागेत सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या संवादकर्ते जेव्हा तिथे मध्यस्थीसाठी पोहोचले, तेव्हा बिल्किस बानो यांनी आपले मत सडेतोडपणे मांडले. त्या म्हणाल्या, गृहमंत्री म्हणतात आम्ही एक इंचही हटणार नाही. तर मी म्हणते आम्हीसुद्धा एका केसाएवढेही हटणार नाही. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, आम्ही (सरकार) सीएएवरून मागे हटणार नाही. अनेक सभांमध्ये अमित शहा म्हणाले की, निर्वासितांना मदत करण्यासाठी आम्ही ही अंमलबजावणी करू आणि आम्ही एक इंचही मागे हटणार नाही.टाइम यादीमध्ये आणखी कोण आहे?या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भारतीयांची नावे समाविष्ट आहेत. यात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्मान खुराना आणि एचआयव्ही संबंधित संशोधन करणारे रवींद्र गुप्ता यांचीही नावे आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिससुद्धा या यादीमध्ये आहेत.
CAA विरोधात आंदोलन करणारी शाहीन बागची 'दादी'ही TIME मॅगझिनमध्ये; ज्या यादीत मोदी, त्यातच 'दादी'
By वैभव देसाई | Published: September 23, 2020 5:17 PM