Join us  

कॅफे कॉफी डे अडचणीत, ₹२२८ कोटींच्या कर्जामुळे कंपनी अडकली दिवाळखोरीच्या संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 10:16 AM

जाणून घ्या काय आहे हे प्रकरण.

कॉफी डे एंटरप्रायझेस विरुद्ध दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, २०१६ च्या कलम ७ अंतर्गत दिवाळखोरीच्या कार्यवाहीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. २२८.४५ कोटी रुपयांच्या कथित डिफॉल्टसाठी आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, बेंगळुरूसमोर हा अर्ज दाखल करण्यात आलाय.

"कंपनी योग्य कायदेशीर सल्ला घेत आहे आणि या प्रकरणातील कंपनीचे हित जपण्यासाठी सर्व योग्य पावलं उचलली जातील," असं कॉफी डे एंटरप्रायझेसनं एका फाइलिंगमध्ये म्हटलं आहे. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलद्वारे (NCLAT) एनसीएलटीच्या त्या आदेशाला स्थिगिती दिल्याच्या एका महिन्यानंतर हा अर्ज दाखल करण्यात आलाय. त्यामध्ये कंपनीविरोधात दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

तुम्हाला हे कळवलं जातंय की २२८,४५,७४,१८० रुपयांच्या कथित डिफॉल्टसाठी कंपनीच्या विरोधात कंपनी लॉ ट्रिब्युनल, बेंगळुरूसमोर आयडीबीआय ट्रस्टशिप सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे वाळखोरी आणि दिवाळखोरी नियम २०१९ च्या नियम ४ सह दिवाळखोरी संहिता २०१६ च्या कलम ७ अंतर्ग अर्ज दाखल करण्यात आल्याचं फायलिंगमध्ये नमूद करण्यात आलंय. कंपनी योग्य कायदेशीर सल्ला घेत आहे आणि वरील बाबतीत तिच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व योग्य पावले उचलणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

टॅग्स :व्यवसायबँक