Join us

“Amazon बंद करा”; ‘या’ संघटनेने केली CBI चौकशीची मागणी, जाणून घ्या नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 9:19 AM

व्यापाऱ्यांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या सीएआयटीने केंद्रातील मोदी सरकारला पत्र लिहून ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीचे नाव म्हणजे ॲमेझॉन. मात्र, व्यापाऱ्यांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या सीएआयटीने केंद्रातील मोदी सरकारला पत्र लिहून ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (cait urges piyush goyal over suspend amazon e commerce portal and demands cbi inquiry in bribery case)

TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी

व्यापाऱ्यांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (cait) केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये ॲमेझॉनच्या  काही कर्मचाऱ्यांनी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहेत. तसेच कथित लाचखोरीची सीबीआय चौकशी देखील करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा

ॲमेझॉनला साइट बंद करण्याचे आदेश द्यावेत

पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात संघटनेने म्हटले आहे की, ॲमेझॉनला त्यांची ई-कॉमर्स साइट बंद करण्याचे आदेश द्यावेत. तसेच चौकशी होईपर्यंत संबंधित सर्व उपक्रम स्थगित करावेत. लाचखोरीचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. जोपर्यंत सीबीआय चौकशी होत नाही, तोपर्यंत ॲमेझॉनला त्यांचे ई-कॉमर्स पोर्टल निलंबित करण्याचे आणि त्याच्याशी संबंधित इतर सर्व उपक्रम थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी आमची मागणी आहे, असे म्हटले आहे. ॲमेझॉनचा कायदेशीर प्रतिनिधी हा लाचखोरीत गुंतला असल्याचे आढळून आले आहे. लाच देऊन त्याने भारतात विविध नियामक मान्यता मिळवल्याचा असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

Adani ग्रुपच्या मुंद्रा पोर्टवर ३००० किलो ड्रग्ज जप्त; सोशल मीडियावरील चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण

दरम्यान, एका अहवालानुसार ॲमेझॉनने आपल्या काही प्रतिनिधींविरुद्ध भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली तपास सुरू केला आहे. या संदर्भात ॲमेझॉनने वरिष्ठ कॉर्पोरेट वकिलांना रजेवर पाठवले आहे. कंपनीत भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही आणि यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असे ॲमेझॉनने एक निवेदन प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनपीयुष गोयलकेंद्र सरकार