Caller ID Service : तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणाचाही नंबर सेव्ह नसेल तर, अशावेळी अनोळखी नंबरवरून कॉल आला की फोन करणारा कोण हा पहिला प्रश्न मनात येतो. आता ही समस्या लवकरच संपणार आहे. आता अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास फोन करणाऱ्याचे नावही दिसेल. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (TRAI) कंपन्यांना यासंदर्भात सूचना दिल्यात.
टेलिकॉम कंपन्यांनी मुंबई आणि हरयाणा सर्कलमध्ये ट्रायल सुरू केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आतापर्यंत ही चाचणी यशस्वी झाली आहे. आता १५ जुलैपासून संपूर्ण देशात 'कॉलिंग नेम प्रेझेंटेशन' (CNP) नावाची ही सुविधा सुरू होईल. यामध्ये सिम खरेदी करताना केवायसी फॉर्मवर भरलेल्या माहितीच्या आधारे फोन करणाऱ्याचे नाव दिसेल. स्पॅम, फ्रॉड कॉल आणि सायबर क्राइमला आळा घालण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. सरकार आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) दबावानंतर कंपन्यांनी ही चाचणी सुरू केली.
कशी काम करते ही सेवा?
सीएनपी कसे काम करत आहे याचा परिणाम जाणून घेण्यासाठी मर्यादित संख्येनx त्याची चाचणी घेण्यात येत आहे. यात इनकमिंग कॉलदरम्यान नंबरसह कॉल करणाऱ्याचे नावही दिसेल. सीएनपी सेवा कंपनीच्या सध्याच्या कॉलर आयडी अॅप्लिकेशनसारखीच आहे. पण त्याचा त्यांच्या व्यवसायावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. या पावलामुळे देशातील सायबर गुन्हे रोखण्यास मदत होईल, असा विश्वास टेलिकॉम कंपन्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय स्पॅम कॉल थांबवण्यातही यश मिळेल. देशात स्पॅम कॉल ही मोठी समस्या बनली आहे. एका सर्व्हेनुसार ६० टक्के लोकांना दिवसाला ३ स्पॅम कॉल्स नक्कीच येतात.
फेक इंटरनॅशनल कॉल्स ब्लॉक करण्याचे निर्देश
सीएनपी कसे काम करत आहे याचा परिणाम जाणून घेण्यासाठी आम्ही मर्यादित संख्येने त्याची चाचणी घेत आहोत. यात इनकमिंग कॉलदरम्यान नंबरसह कॉल करणाऱ्याचे नावही दिसेल. सीएनपी सेवा कंपनीच्या सध्याच्या कॉलर आयडी अॅप्लिकेशनसारखीच आहे. पण त्याचा त्यांच्या व्यवसायावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. या पावलामुळे देशातील सायबर गुन्हे रोखण्यास मदत होईल, असा विश्वास टेलिकॉम कंपन्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय स्पॅम कॉल थांबवण्यातही यश मिळेल. देशात स्पॅम कॉल ही मोठी समस्या बनली आहे. एका सर्व्हेनुसार ६० टक्के लोकांना दिवसाला ३ स्पॅम कॉल्स नक्कीच येतात.
'फेक कॉल्स ब्लॉक करा'
ज्यामध्ये कॉल्स आल्यावर भारतीय नंबर्स दिसतात असे सर्व फेक इंटरनॅशनल कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं टेलिकॉम ऑपरेटर्सना दिले आहेत. दूरसंचार विभागाकडे यासंदर्भातील तक्रारी येत होत्या. या कॉल्सच्या माध्यमातून लोकांची सायबर क्राईम आणि आर्थिक फसवणूक केली जात आहे.