मुंबई : जिओने आपल्या ग्राहकांना येणारे कॉल वाढावेत, यासाठी कॉल रिंगची वेळ कमी केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून व्होडाफोन व एअरटेलनेही तसेच केले आहे. यापुढे व्होडाफोन व एअरटेलवरून इतरांना केलेल्या कॉलची रिंगही २५ सेकंदांचीच असेल.
कॉल रिंग किती वेळाची असावी यावर ट्रायने संबंधित कंपन्या व तज्ज्ञांची मते मागवली होती. पण त्याआधीच रिलायन्स जिओने आपल्या कॉल रिंगची वेळ २0 सेकंदांची केली. त्यामुळे तुम्ही मोबाइलवरून दुसऱ्याला फोन केल्यास ती रिंग आतापर्यंत ४५ सेकंद वाजत असे. जिओने ती २५ सेकंदांवर आणली. एअरटेल, व्होडाफोन, आयडियाच्या ग्राहकांनी जिओच्या ग्राहकाला फोन केल्यास आता रिंग २५ सेकंदच वाजेल. नंतर फोन डिसकनेक्ट होईल. अशा वेळी जिओचा ग्राहक तुम्हाला कॉल बॅक करेल. यातून या तीन कंपन्यांना एका कॉलमागे सहा पैसे मिळतील. एखाद्या कंपनीच्या कार्डावरून दुसºया कंपनीच्या कार्डाच्या ग्राहकाला फोन केल्यास त्याबद्दल इंटरकनेक्ट युसेज चार्ज द्यावा लागतो. म्हणजेच तुम्ही केलेल्या कॉलसाठी तुमची कंपनी दुसºया कंपनीला ती रक्कम देते.
जिओने सर्वात आधी ही स्पर्धा सुरू केली. त्यांच्या ग्राहकाने अन्य कंपनीच्या ग्राहकाला फोन केल्यास कॉल रिंग २0 सेकंद
वाजून बंद होऊ लागली. फोन डिसकनेक्ट झाल्यानंतर ज्याला फोन केला होता, तो ग्राहक उलटा फोन करतो, असा अनुभव आहे. त्यामुळे जिओचा खर्च कमी झाला आणि अन्य कंपन्यांचा खर्च वाढला. त्यामुळे व्होडाफोन व एअरटेलने ही खेळी केली आहे.
लक्ष ट्रायच्या निर्णयाकडे
व्होडाफोन व एअरटेलने त्यांच्या निर्णयाची माहिती ट्रायला दिली. जिओला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतल्याचे या कंपन्यांनी नमूद केले. ट्रायने यावर १४ आॅक्टोबरला रोजी बैठक बोलावली आहे. ट्रायचा निर्णय होण्याआधीच कंपन्यांनी परस्पर निर्णय घेतल्याने ट्राय काही कारवाई करणार का, हे त्यावेळी स्पष्ट होईल.
टेलिकॉम कंपन्यांतील स्पर्धेमुळे कॉल रिंगची वेळ झाली कमी
जिओने आपल्या ग्राहकांना येणारे कॉल वाढावेत, यासाठी कॉल रिंगची वेळ कमी केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून व्होडाफोन व एअरटेलनेही तसेच केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:14 AM2019-10-04T04:14:15+5:302019-10-04T04:15:06+5:30