नवी दिल्ली : फेसबुक वापरकर्त्यांचा डाटा चोरीचा आरोप असलेली ब्रिटनस्थित राजकीय सल्लागार संस्था केम्ब्रिज अॅनालिटिकाने अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. अमेरिकेच्या दिवाळखोरी संहितेच्या कलम ७ अन्वये हा अर्ज कंपनीने केला आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका एलएलसीची मालमत्ता सुमारे १00,00१ डॉलर ते ५00,000 डॉलर असून, देणे मात्र १ दशलक्ष डॉलर ते १0 दशलक्ष डॉलर आहे. कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीलाच कामकाज बंद करणार असल्याची घोषणा केली होती. प्रसारमाध्यमांतील नकारात्मक बातम्यांमुळे व्यवसाय तोट्यात गेल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोर्टात केम्ब्रिज अॅनालिटिकाचा दिवाळखोरीसाठी अर्ज सादर
फेसबुक वापरकर्त्यांचा डाटा चोरीचा आरोप असलेली ब्रिटनस्थित राजकीय सल्लागार संस्था केम्ब्रिज अॅनालिटिकाने अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:33 PM2018-05-18T23:33:46+5:302018-05-18T23:33:46+5:30