Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनपा राबविणार स्वच्छ भारत अभियान २ ऑक्टोबर रोजी मोहीम

मनपा राबविणार स्वच्छ भारत अभियान २ ऑक्टोबर रोजी मोहीम

अकोला : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येत्या २ ऑक्टोबर रोजी महापालिका प्रशासन शहरात स्वच्छ भारत अभियान राबविणार आहे. याकरिता शिक्षण विभागासह सर्वच विभाग प्रमुखांना मंगळवारी निर्देश देण्यात आले.

By admin | Published: September 30, 2014 09:38 PM2014-09-30T21:38:50+5:302014-09-30T21:38:50+5:30

अकोला : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येत्या २ ऑक्टोबर रोजी महापालिका प्रशासन शहरात स्वच्छ भारत अभियान राबविणार आहे. याकरिता शिक्षण विभागासह सर्वच विभाग प्रमुखांना मंगळवारी निर्देश देण्यात आले.

Campaign to be organized by Clean India Campaign on 2nd October | मनपा राबविणार स्वच्छ भारत अभियान २ ऑक्टोबर रोजी मोहीम

मनपा राबविणार स्वच्छ भारत अभियान २ ऑक्टोबर रोजी मोहीम

ोला : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येत्या २ ऑक्टोबर रोजी महापालिका प्रशासन शहरात स्वच्छ भारत अभियान राबविणार आहे. याकरिता शिक्षण विभागासह सर्वच विभाग प्रमुखांना मंगळवारी निर्देश देण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानद्वारे संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबविण्याचा मनपाचा मानस आहे. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने तयारीदेखील केली असून, विभाग प्रमुखांना सूचनावजा निर्देश देण्यात आले आहेत. प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे यांनी बैठकीत विभाग प्रमुखांना स्वच्छ भारत अभियानाविषयी माहिती देत, तयारीचे निर्देश दिले.

बॉक्स...
स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय
मनपा क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियान अंतर्गत शाळा स्तरावर स्वच्छता मोहीम, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील. याकरिता मनपाच्या शिक्षण विभागाने सर्वच मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.

Web Title: Campaign to be organized by Clean India Campaign on 2nd October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.