Lokmat Money > बिझनेस न्यूज > इलेक्ट्रिक कारची बॅटरी चीनशिवाय बनू शकते का? जाणून घ्या प्रश्नाचं कठीण उत्तर

इलेक्ट्रिक कारची बॅटरी चीनशिवाय बनू शकते का? जाणून घ्या प्रश्नाचं कठीण उत्तर

प्रत्येक टप्प्यावर ड्रॅगनचा चार्ज, मग इलेक्ट्रिक कारची बॅटरी अन्य देशांना बनवता येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 05:15 PM2023-05-19T17:15:55+5:302023-05-19T17:16:55+5:30

प्रत्येक टप्प्यावर ड्रॅगनचा चार्ज, मग इलेक्ट्रिक कारची बॅटरी अन्य देशांना बनवता येईल का?

Can electric car batteries be made without China Know the difficult answer to the question india america | इलेक्ट्रिक कारची बॅटरी चीनशिवाय बनू शकते का? जाणून घ्या प्रश्नाचं कठीण उत्तर

इलेक्ट्रिक कारची बॅटरी चीनशिवाय बनू शकते का? जाणून घ्या प्रश्नाचं कठीण उत्तर

इलेक्ट्रिक कार बॅटरीशिवाय चालू शकत नाही आणि बॅटरी चीनशिवाय बनू शकत नाही, अशी सध्या जगाची परिस्थिती आहे. चीनला बाजूला सारून जग इलेक्ट्रिक कारची बॅटरी बनवू शकते का, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नकारार्थी असेच आहे. जगाने कितीही प्रयत्न केले तरी २०३० पर्यंत संपूर्ण जगात जेवढे बॅटऱ्यांचे उत्पादन होईल, त्यापेक्षा दुप्पट बॅटऱ्या एकट्या चीनमध्ये बनतील.

चीनची एक हाती सत्ता

बॅटरीसाठी आवश्यक असलेल्या धातू खनिजांच्या पाय खंडातील बहुतांश खाणीवर चिनी कंपन्यांची मालकी आहे. कोगोमधील कोबाल्टच्या खाणी चिनी कंपन्यांनी विकत घेतल्या आहेत. जगातील ४१ टक्के कोबाल्ट खाणी तसेच बहुतांश लिथियमच्या खाणी चिनी कंपन्यांच्या ताब्यात आहेत. निकेल आणि ग्रॅफाइटचा पुरवठाही चीनच्या नियंत्रणात आहे.

सर्वत्र चीन.....

  • ४२ % कोबाल्ट खाणी चिनी कंपन्यांच्या ताब्यात.
  • ७३% कोबाल्ट रिफायनिंग चीनमध्ये केले जाते.
  • ७७% कॅथोड्स चीनमध्ये बनवले जातात.
  • ९२ % ॲनोड्स चीनमध्ये बनलेले असतात.
  • ६६ % बॅटरी सेल्स चीनमध्ये जोडल्या जातात.
  • ५४% इलेक्ट्रिक कार चीनमध्ये बनवल्या जातात.
     

अडचणी काय आहेत?

पाश्चात्य देशांतील काही कंपन्या आता यात उतरत असल्या तरी खाण पूर्णाशाने कार्यरत होण्यास २० वर्षे लागतात.

त्यामुळे चिनी कंपन्यांना गाठणे पाश्चात्त्य कंपन्यांसाठी जवळपास अशक्य आहे. शिवाय पाश्चात्य देशांतील कामगार व पर्यावरणविषयक कायदे कडक आहेत. त्यामुळे धातूंना बॅटऱ्यांत वापरण्यायोग्य बनविण्यासाठी प्रचंड खर्च येतो. चीनमध्ये हे सगळेच कायदे सरकारच्या मर्जीनुसार वाकवले जातात.

Web Title: Can electric car batteries be made without China Know the difficult answer to the question india america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.