Aadhaar Card : आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचं दस्तऐवज आहे. अनेक प्रकारच्या कामांसाठी, तसंच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. आधारच्या सर्व ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक यूआयडीएआयशी लिंक असणं आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑनलाइन काही आधार कार्डमध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी मिळतो.
मोबाइल नंबर ऑनलाइन अपडेट होईल का?
जर तुम्ही नवीन नंबर घेतला असेल आणि तुम्हाला तुमचा नवीन नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर तुम्ही हे देखील सहज करू शकता. अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो की, आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर ऑनलाइन अपडेट करता येईल का? आधार कार्डमध्ये तुम्ही मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करू शकत नाही. यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जावं लागेल.
मोबाईल नंबर अपडेट कसा करावा?
आपण आपल्या आधार कार्डमधील मोबाइल नंबर केवळ ऑफलाइन पद्धतीनं अपडेट करू शकता. चला तर मग जाणून घेऊया आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया काय आहे?
- सर्वप्रथम आपल्या घराजवळील कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर जा.
- आधारमध्ये मोबाइल नंबर किंवा अन्य माहिती अपडेट करण्यासाठी करेक्शन फॉर्म भरा.
- आधार एक्झिक्युटिव्हकडे फॉर्म भरून सबमिट करा.
- बायोमेट्रिक्स देऊन तुमचे सर्व तपशील व्हेरिफाय करा.
- यासाठी तुम्हाला ५० रुपयेही मोजावे लागतील.
- यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (यूआरएन) असलेली स्लिप दिली जाईल. या स्लिपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या रिक्वेस्टचं स्टेटस चेक करू शकता.
- काही दिवसांनी तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल.