Lokmat Money > बिझनेस न्यूज > अजूनही घेऊ शकता जिओ सरप्राइज ऑफरची मजा

अजूनही घेऊ शकता जिओ सरप्राइज ऑफरची मजा

रिलायन्स जिओच्या "समर सरप्राइज ऑफर"ला भलेही ट्रायने मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी अद्यापही ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात

By admin | Published: April 8, 2017 01:42 PM2017-04-08T13:42:45+5:302017-04-08T13:48:46+5:30

रिलायन्स जिओच्या "समर सरप्राइज ऑफर"ला भलेही ट्रायने मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी अद्यापही ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात

Can still take a look at Geo Surprise offer | अजूनही घेऊ शकता जिओ सरप्राइज ऑफरची मजा

अजूनही घेऊ शकता जिओ सरप्राइज ऑफरची मजा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - रिलायन्स जिओच्या "समर सरप्राइज ऑफर"ला भलेही दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी अद्यापही ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ट्रायने दिलेल्या आदेशानंतरही रिलायन्सने तात्काळ स्वरुपात ही ऑफर बंद केलेली नाही. जिओची वेबसाईट www.jio.com च्या पेजवर गेले असता एक नोटिफिकेशन दिसत आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांत "समर सरप्राइज ऑफर" बंद केली जाणार आहे. तोपर्यंत सबस्क्राइब करणारे या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. इतकंच नाही तर कंपनीने ही ऑफर केव्हा बंद करण्यात येणार आहे याची तारीखही जाहीर केलेली नाही. दरम्यान काही तज्ञांनी प्रश्न उपस्थित करत ट्रायने जिओला तात्काळ ऑफर मागे घेण्याचा आदेश का दिला नाही अशी विचारणा केली आहे. 
 
 
जिओने आपल्या वेबसाईटवर लिहिलं आहे की, "ट्रायने तीन महिन्यांच्या समर सरप्राइज ऑफरला मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही ऑफर मागे घेतली जाईल. तोपर्यंत सबस्क्राइब करणारे या ऑफरमधील सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात. 31 मार्च रोजी समर सरप्राइज ऑफरची घोषणा करण्यात आली होती. ऑफरनुसार 15 एप्रिलआधी नोंदणी आणि 303 रुपयांचा रिचार्ज करणा-या ग्राहकांना पुढील तीन महिन्यांसाठी वॉईस कॉलिंग आणि इंटरनेट सेवा मोफत मिळणार होती. 
हॅप्पी न्यू इयर ऑफर संपेपर्यंत अपेक्षेएवढ्या ग्राहकांनी प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी न केल्याने जिओने प्राइम मेंबरशिपसाठी 15 दिवसांची मुदत वाढवली होती. जिओकडून सर्व ग्राहकांना दररोज 1 GB मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती. मात्र, रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली.तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती.  तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना 15 एप्रिलपूर्वी प्राईम मेंबरशिप घेणं गरजेचं करण्यात आलं होतं. 
 
यापुर्वी सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4G अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. यानंतर कंपनीने ही मुदत पुढील तीन महिन्यांसाठी वाढवत 31 मार्च केली होती. 31 मार्च तारखेलाच कंपनीने समर सरप्राइज ऑफर आणली होती, ज्यावर ट्रायला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ऑफर मागे घेण्याचा आदेश देण्यात आला होता. 
 
तज्ञांनी उपस्थित केले प्रश्न - 
दरम्यान दूरसंचार नियामक तज्ञांनी ट्रायने जिओला तात्काळ स्वरुपात ही ऑफर बंद करण्याचा आदेश का दिला नाही अशी विचारणा केली आहे. एका वृत्तापत्राशी केलेल्या बातचीतमध्ये त्यांनी सांगितलं की, "ट्राय अॅक्टमध्ये सल्ला देण्याची तरतूद नाही. अधिका-यांकडे आदेश देण्याचा, कायदेशीर आदेश जारी करण्याचा अधिकार आहे. मात्र असा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही". 
 
जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉप-
एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4G सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या या लॅपटॉपमध्ये 4G सिम कार्ड स्लॉट असल्याने इंटरनेटचा वापर यावर सहजशक्य होणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार,  Foxconn कंपनी हे लॅपटॉप बनवणार आहे. 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले यामध्ये असणार तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी कॅमेरा असणार आहे. याशिवाय स्लिम कि-बोर्ड असणार आहे. लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम क्वाड-कोअर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मेमरी असू शकते. 1.2 किलोग्राम इतकं या लॅपटॉपचं वजन असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून याबबात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही. 
 

 

Web Title: Can still take a look at Geo Surprise offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.