Join us

Canada सरकारनं भारतीय कंपनीला ठोठावला लाखो डॉलर्सचा दंड, का अडकली Infosys?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:17 PM

कॅनडाचे पंतप्रधान (Canada PM) जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या सरकारनं भारतीय कंपनी इन्फोसिसवर (Infosys) कारवाई केली आहे. पाहा काय आहे कारण?

कॅनडाचे पंतप्रधान (Canada PM) जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या सरकारनं भारतीय कंपनी इन्फोसिसवर (Infosys) कारवाई केली आहे. कर्मचारी आरोग्य कर (ईएचटी) कमी भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. २०२० या वर्षासाठी कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. इन्फोसिसलाकॅनडाच्या अर्थ मंत्रालयाकडून ९ मे रोजी याबाबतचे आदेश मिळाले होते. 

३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी कर्मचारी आरोग्य कर कमी भरल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे, असं कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला १,३४,८२२.३८ कॅनेडियन डॉलरचा दंड ठोठावण्यात आलाय. त्याचा कंपनीच्या आर्थिक, ऑपरेशनल किंवा इतर कामांवर कोणताही परिणाम झालेला नाही. 

विशेष म्हणजे कॅनडामध्ये इन्फोसिस कंपनीची लक्षणीय उपस्थिती आहे. ब्रिटिश कोलंबियातील अल्बर्टा, मिसिसागा, बर्नाबेसह देशात अनेक ठिकाणी इन्फोसिसची कार्यालयं आहेत. याशिवाय ओंटारियो येथेही एक कार्यालय आहे. 

ईएचटी म्हणजे काय? 

ओंटारियो आणि ब्रिटिश कोलंबिया सारख्या काही प्रांतांमध्ये, कर्मचारी आरोग्य कर (ईएचटी) हा कंपनीवर आकारला जाणारा अनिवार्य कर आहे. वेतन, बोनस, करपात्र लाभ आणि कर्मचाऱ्याला मिळालेले स्टॉक्स अशा अनेक बाबींवर त्याची गणना केली जाते. त्याचा सर्वात मोठा उद्देश प्रांतातील आरोग्य सेवांच्या निधीला पाठिंबा देणं हा आहे.

टॅग्स :कॅनडाइन्फोसिसजस्टीन ट्रुडो