Join us  

तुमचेही 'या' सरकारी बँकेत खाते आहे का? आता तत्काळ बदलामुळे होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 5:54 PM

क्लासिक डेबिट कार्डसाठी डेली एटीएममधून पैसे काढण्याची लिमिट 40,000 रुपयांवरून 75,000 रुपये करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कॅनरा बँकेने  (Canara Bank)आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढणे (ATM Cash Withdrawal), पॉइंट ऑफ सेल (PoS) आणि ई-कॉमर्स ट्रान्सजक्शनसाठी (E-Commerce Transaction) आपल्या डेली कार्ड ट्रान्जक्शनच्या लिमिटमध्ये तत्काळ प्रभावाने बदल करण्याची घोषणा केली आहे. 

क्लासिक डेबिट कार्डसाठी डेली एटीएममधून पैसे काढण्याची लिमिट 40,000 रुपयांवरून 75,000 रुपये करण्यात आली आहे. या कार्डांसाठी पीओएस लिमिट सध्याच्या 1 लाख रुपयांच्या लिमिटवरून 2,00,000 रुपये प्रतिदिन केली जाईल. एनएफसी (कॉन्टॅक्टलेस) साठी बँकेने कोणतीही रक्कम वाढवली नाही, मर्यादा अद्याप 25,000 रुपये निश्चित केली आहे. दरम्यान, कॉन्टॅक्टलेस ट्रान्जक्शन प्रति प्रसंगी 5000 रुपयांपर्यंत आणि दररोज 5 ट्रान्जक्शनसाठी परवानगी आहे.

कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्ड ट्रान्जक्शनवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जारी केलेले डीफॉल्ट कार्ड केवळ एटीएम आणि पीओएसमध्ये घरगुती वापरासाठी वापरले जाऊ शकते. कार्ड जारी करताना आंतरराष्ट्रीय/ऑनलाइन (ई-कॉमर्स) वापर आणि कॉन्टक्टलेस वापरास परवानगी नाही. ग्राहकांना एटीएम/शाखा/मोबाइल बँकिंग/इंटरनेट बँकिंग/ आयव्हीआरएसद्वारे कार्ड चॅनलनुसार (एटीएम/पीओएस/ई-कॉमर्स, घरगुती/आंतरराष्ट्रीय, एनएफसी कॉन्टॅक्टलेस) चालू/बंद करण्याची आणि लिमिट सेट करण्याची सुविधा दिली जाते. 

पीएनबी डेबिट कार्ड ट्रान्जक्शनपंजाब नॅशनल बँकेने डेबिट कार्ड ट्रान्जक्शन लिमिटमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक सर्व प्लॅटिनम मास्टरकार्ड, रुपे आणि व्हिसा गोल्ड डेबिट कार्ड तसेच रुपे सिलेक्ट आणि व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डसाठी लिमिट वाढवणार आहे.

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ट्रान्जक्शनएचडीएफसी बँकेने थर्ड पार्टीच्या व्यापाऱ्यांद्वारे भाडे भरण्यासाठी चार्ज स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यात आला आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, थर्ड पार्टीच्या व्यापाऱ्यांद्वारे केलेल्या भाड्याच्या पेमेंटसाठी एकूण ट्रान्जक्शनच्या रकमेच्या 1 टक्के चार्ज कॅलेंडर महिन्याच्या दुसऱ्या भाड्याच्या ट्रान्जक्शनपासून सुरू होईल.

टॅग्स :एटीएमव्यवसाय