Dabur News: डाबर इंडियाच्या तीन विदेशी उपकंपन्यांच्या विरोधात अमेरिका आणि कॅनडामध्ये सुमारे ५४०० खटले दाखल करण्यात आले आहेत. या बातमीनंतर डाबर इंडियाच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. कामकाजादरम्यान शुक्रवारी डाबरचा शेअर ५२०.०५ रुपयांवर व्यवहार करत होता. या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५०३.६५ रुपये आहे आणि उच्चांकी पातळी ६१०.७५ रुपये आहे.
या सब्सिडायरी कंपन्यांच्या 'हेअर-रिलॅक्सर' उत्पादनांमुळे गर्भाशयाचा कर्करोग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच इतर संबंधित आरोग्य समस्या निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आलाय. डाबरच्या या उपकंपन्यांची नावे नमस्ते लॅबोरेटरीज एलएलसी, डर्मोविवा स्किन एसेंशियल इंक आणि डाबर इंटरनॅशनल लिमिटेड अशी आहेत.
शेअर बाजाराला दिली माहिती
यूएस आणि कॅनडामधील दोन्ही फेडरल आणि राज्य न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. मल्टी डिस्ट्रिक्ट लिटिगेशनमध्ये ५,४०० प्रकरणं आहेत ज्यात नमस्ते, डर्मोविवा आणि डीआयएनटीएल, तसंच इतर काही कंपन्यांना प्रतिवादी बनवले असल्याचं डाबरनं म्हटलं. "डाबर या टप्प्यावर नुकसानभरपाई, दंड इत्यादींमुळे कंपनीवर अपेक्षित आर्थिक परिणामाबद्दल डाबरनं प्रतिक्रिया दिली. सेटलमेंट किंला निर्णयाच्या परिणामुळे असा कोणताही प्रभाव निर्धारित केला जाऊ शकत नाही, असं कंपनीनं म्हटलं.
हेअर रिलॅक्सरमुळे कॅन्सर
डाबर इंडियानं सांगितलं की ग्राहकांनी हेअर रिलॅक्सर प्रोडक्टबाबत आरोप केले आहेत. यामध्ये अशी केमिकल्स आहेत, ज्याच्या वापरानं गर्भाशयाचा कॅन्सर आणि अन्य आरोग्याच्या समस्या होऊ शकतात असे आरोप करण्यात आले. डाबर इंडियाच्या २७ सब्सिडायरी कंपन्या आहेत, त्यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग इन्कमपैकी २६.६० टक्क्यांचं योगदान दिलं होतं.
डाबरच्या सब्सिडायरी कंपन्यांच्या उत्पादनापासून कॅन्सरचा आरोप; अमेरिका, कॅनडात ५४०० खटले, शेअर्स आपटले
या बातमीनंतर डाबर इंडियाच्या शेअर्सवर दबाव दिसून आला.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 01:08 PM2023-10-20T13:08:03+5:302023-10-20T13:09:11+5:30