दिग्गज कंपनी युनिलीव्हरच्या (Unilever) अनेक शॅम्पू ब्रँड्समध्ये बेंझीन नावाचे घातक केमिकल आढळून आले आहे. या केमिकलपासून कॅन्सरही होऊ शकतो. यानंतर आता कंपनीने Dove, Nexxus, Suave, Tigi आणि Tresemme एअरोसोल सह अनेक ड्राय शॅम्पू अमेरिकन बाजारातून परत मागवले आहेत.
ऑक्टोबर 2021 पूर्वी तयार करण्यात आले होते प्रोडक्ट्स -फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटवर शुक्रवारी पोस्ट करण्यात आलेल्या एका नोटिशीनुसार, युनिलिव्हरचे हे प्रोडक्ट ऑक्टोबर 2021 पूर्वी तयार करण्यात आले होते आणि जगभरातील रिटेलर्सना वितरितही करण्यात आले होते. मात्र, आता या प्रोडक्ट्समध्ये बेंझीन नावाचे घातक केमिकल आढळून आल्याने कंपनीने ते रिकॉल केले आहेत.
या वृत्तामुळे पुन्हा एकदा पर्सनल केअर प्रोडक्ट्समधील एअरोसोलच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहे. गेल्या दीड वर्षात अनेक एअरोसोल सनस्क्रीन, जसे की जॉनसन अॅण्ड जॉन्सनचे न्यूट्रोगेना, अॅडज्वेल पर्सनल केअर कंपनीची बनाना बोट आणि बियर्सडॉर्फ एजीच्या कॉपरटोन बरोबरच, प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल कंपनी, जसे की स्प्रे-ऑन antiperspirants संदर्भातही, असे वृत्त आले आहेत.
ड्राय शॅम्पू म्हणजे काय? -कोलिन्स डिक्शनरीनुसार, ड्राय शॅम्पू हा पावडरअथवा स्प्रे प्रमाणे असतो. सर्वसाधारणपणे या प्रोडक्ट्सचा वापर केस ओले न करता स्वच्छ करण्यासाठी केला जातो. क्लिवलँड क्लिनिकनुसार, हे अल्कोहोल अथवा स्टार्च आधारित स्प्रे केसांवरील ग्रीस आणि तेल हटवते. काही ड्राय शॅम्पूमध्ये एअरोसोल स्प्रे असते. तर काहींमध्ये केसांच्या रंगासारखे दिसावे म्हणून टिंटेड पावडर असते.