नी मुंबई : उमेदवारी उशिरा घोषित झाल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रचारासाठी फक्त १३ दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे प्रचार साहित्य छापण्याच्या कामास वेग आला आहे. कार्यालय सुरू करण्यापासून जाहीरनामा घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आणि कार्यकर्त्याला धावपळ करावी लागणार आहे. नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. राष्ट्रवादी काँगे्रस वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित झाले नव्हते. ऐरोली मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित झाला नव्हता. महायुती झाली तर बेलापूर भाजपाला जाणार की शिवसेनेला याबाबत काहीच नक्की झाले नव्हते. आघाडीमध्ये दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळे काँगे्रसमध्ये थोडेसे गाफील वातावरण होते. यामुळे कार्य अहवाल तयार करणे, जाहीरनामा, मतदार याद्या, प्रचार साहित्य यांची तयारी करण्यात आली नव्हती. शेवटच्या क्षणी उमेदवारी घोषित झाल्यानंतर उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. सर्वांचे जाहीरनामे तयार करण्याचे काम सुरू आहे. एका प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी सर्व कार्यकर्त्यांना एसएमएस पाठवून त्यांच्या प्रभागातील संस्था, संघटना व इतर माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. तत्काळ सर्वांचे फोन नंबर व इतर माहिती मागविली आहे. निवडणूक प्रचारासाठी फक्त १३ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल ४ लाख ८ हजार १०३ मतदार आहेत. या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. अनेकांकडे कार्यकर्त्यांची फौजच नाही. किती बुथ लावावे लागणार याची रणनीती ठरवली जात असली तरी बुथसाठी आवश्यक मनुष्यबळही काही उमेदवारांकडे नाही. प्रचार साहित्य घरोघरी पोहोचविणेही शक्य होणार नाही. बेलापूर मतदारसंघामध्ये ३ लाख ८२ हजार मतदार आहेत. या मतदारांपर्यंत कमी कालवधीमध्ये कसे पोहोचायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मोठ्या सभा घेण्यापेक्षा कार्यकर्त्यांना प्रभागात लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रचारासाठी कार्यकर्तेही अपुरे पडू लागले असून, राष्ट्रवादी वगळता इतर उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. -----चौकटछापखाने धडधडू लागलेसर्वच उमेदवारांनी प्रचार साहित्य, पत्रके, जाहीरनामे छापण्याचे काम सुरू केले आहे. अनेक छापखान्यांमध्ये दिवसरात्र काम सुरू झाले आहे. लवकर साहित्य छापून मिळावे यासाठी सर्वांनीच आग्रह धरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे छपाईचे काम करणार्यांची दिवाळीअगोदरच दिवाळी सुरू झाली आहे. चौकटसर्व भिस्त कार्यकर्त्यांवर उमेदवारास स्वत: प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार करणे, घरोघरी भेटी देणे एवढ्या कमी कालावधीमध्ये शक्य होणार नाही. यामुळे पक्षाची भूमिका घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आहे. मात्र काही उमेदवारांकडे कार्यकर्तेच नसल्याने त्यांचा कारभार रामभरोसे सुरू आहे.
मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उमेदवारांसमोर आव्हान सर्वांचीच होणार दमछाक : उमेदवारी उशिरा घोषित झाल्याचा परिणाम
नवी मुंबई : उमेदवारी उशिरा घोषित झाल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रचारासाठी फक्त १३ दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे प्रचार साहित्य छापण्याच्या कामास वेग आला आहे. कार्यालय सुरू करण्यापासून जाहीरनामा घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आणि कार्यकर्त्याला धावपळ करावी लागणार आहे.
By admin | Published: September 30, 2014 09:39 PM2014-09-30T21:39:14+5:302014-09-30T21:39:14+5:30