नवी दिल्ली - गेल्या चार वर्षांमध्ये भारताच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न लक्षणीय प्रमाणात वाढले असून, ते प्रतिव्यक्ती 79 हजार 882 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्री विजय गोयल यांनी आज संसदेत ही माहिती दिली.
यूपीए सरकारच्या चार वर्षांच्या तुलनेत मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात दरडोई उत्पन्नात सातत्याने वाढ झाली आहे. 2011-12 ते 2014-15 या काळात दरडोई उत्पन्न 67 हजार 594 रुप.होते. हे उत्पन्न 2014-15 ते 2017-18 या काळात वाढून 79 हजार 882 रुपये झाले. अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्री विजय गोयल यांनी गेल्या चार वर्षांतील देशामधील दरडोई उत्पन्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली.
या उत्तरानुसार 2013-14 या वर्षांत दरडोई उत्पनात 4.6 टक्के वाढ होईन दरडोई उत्पन्न 68 हजार 572 रुपयांवर पोहोचले. 2014-15 या आर्थिक वर्षात दरडोई उत्पन्न 6.2 टक्क्यांनी वाढून 72 हजार 804 रुपयांवर पोहोचले. 2015-16 मध्ये हा आकडा 6.9 टक्क्यांनी वाढून 77 हजार 826 आणि 2016-17मध्ये 82 हजार 229 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती गोयल यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली आहे.
भारताचे दरडोई उत्पन्न वाढले, चार वर्षांत पोहोचले 80 हजारांवर
गेल्या चार वर्षांमध्ये भारताच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 08:12 PM2018-08-08T20:12:55+5:302018-08-08T20:13:18+5:30