Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्कुटरमध्ये कारसारखी टेक्नॉलॉजी; होन्डाची नवी टू-व्हीलर लाँच, जाणून घ्या किंमत

स्कुटरमध्ये कारसारखी टेक्नॉलॉजी; होन्डाची नवी टू-व्हीलर लाँच, जाणून घ्या किंमत

कंपनीने दो मॉडेलध्ये ही दुचाकी ग्राहकांच्या भेटीला आणली आहे.  डीलक्स आणि स्मार्टमध्ये सादर करण्यात आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:10 PM2023-09-29T12:10:35+5:302023-09-29T12:11:40+5:30

कंपनीने दो मॉडेलध्ये ही दुचाकी ग्राहकांच्या भेटीला आणली आहे.  डीलक्स आणि स्मार्टमध्ये सादर करण्यात आली आहे

Car-like technology in a scooter; Honda's new smart limited edition two-wheeler launch | स्कुटरमध्ये कारसारखी टेक्नॉलॉजी; होन्डाची नवी टू-व्हीलर लाँच, जाणून घ्या किंमत

स्कुटरमध्ये कारसारखी टेक्नॉलॉजी; होन्डाची नवी टू-व्हीलर लाँच, जाणून घ्या किंमत

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने 28 सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी होन्डची लोकप्रिय स्कूटर एक्टिव्हाची लिमिटेड एडिशन लॉन्च केली आहे. या स्कूटरची लिमिटेड एडिशन एंटी-थेफ्ट सिस्टमसह कारसारख्या अॅडवांस्ड टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. Key-लेस इंजन स्टार्ट/स्टॉप फीचरलेस आहे. कंपनीने डिलक्स आणि स्मार्ट या दोन व्हेरियंटमध्ये ही नवी टु-व्हिलर लाँच केली आहे.  

कंपनीने दो मॉडेलध्ये ही दुचाकी ग्राहकांच्या भेटीला आणली आहे.  डीलक्स आणि स्मार्टमध्ये सादर करण्यात आली आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 80,734 रुपए आहे. स्कूटरची बुकिंग सुरु करण्यात आली आहे. काही ठराविक कालमर्यादेतसह सर्वच होंडा रेड विंग डीलरशिपकडे ही दुचाकी खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 

होंडा स्कूटरसोबत १० वर्षांचे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 7 वर्षे ऑप्शनल) असणार आहे. भारतीय बाजारात या बाईकची स्पर्धा हीरो जूम, सुजुकी अॅक्सेस आणि TVS ज्युपिटर या गाड्यांसोबत होणार आहे. 

एक्टीव्हा
एक्टिवा लिमिटेड एडिशन :किंमत
एक्टिवा डीएलएक्स लिमिटेड एडिशन
   ₹80,734
एक्टिवा स्मार्ट लिमिटेड एडिशन   ₹82,734


एक्टिवा लिमिटेड एडिशनच्या डिझाईनमध्ये जास्त बदल दिसून येत नाही. स्कूटरमध्ये डार्क रंगाची थीम आणि बॉडी पॅनलवर स्ट्राइप ग्राफिक्ससह ब्लॅक क्रोम एलिमेंट्स आहेत. एक्टिवा का 3D लोगो ब्लॅक क्रोम गार्निशसह देण्यात आला आहे. रियर ग्रैब रेलवर बॉडी कलर डार्क फिनिश आहे. OBD-2 एमिशन नॉर्म्स अनुसार 109.51cc चे सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड फ्यूल-इंजेक्टेड इंजन आहे. हे इंजन 7.73 bhp च्या पावर आणि 8.84 Nm चा टॉर्क जनरेट करते. कंपनीने स्कूटरच्या माइलेजमध्ये 10% का वाढ झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

स्मार्ट की

स्मार्ट की कंट्रोल फिचर या गाडीला देण्यात आलं आहे. स्मार्ट की चे अँसर बॅक बटन (Answer Back Button) दाबल्यानंतर ४ इंडीकेटर ब्लिंक केले जातील. 

Web Title: Car-like technology in a scooter; Honda's new smart limited edition two-wheeler launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.