Lokmat Money > बिझनेस न्यूज > Car On Loan : लोनवर कार घेणं पडतं महाग; पाहा किती फेडता तुम्ही लोनची रक्कम

Car On Loan : लोनवर कार घेणं पडतं महाग; पाहा किती फेडता तुम्ही लोनची रक्कम

Car On Loan : नवीन कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकदा ते पूर्ण करण्यासाठी आपण लोनवर कार घेतो. पण तुम्ही त्यासाठी किती रक्कम फेडता माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 10:45 AM2022-03-08T10:45:16+5:302022-03-08T10:45:52+5:30

Car On Loan : नवीन कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकदा ते पूर्ण करण्यासाठी आपण लोनवर कार घेतो. पण तुम्ही त्यासाठी किती रक्कम फेडता माहितीये?

Car On Loan Expensive to buy a car on loan See how much you repay the loan amount | Car On Loan : लोनवर कार घेणं पडतं महाग; पाहा किती फेडता तुम्ही लोनची रक्कम

Car On Loan : लोनवर कार घेणं पडतं महाग; पाहा किती फेडता तुम्ही लोनची रक्कम

Car On Loan : नवीन कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकदा ते पूर्ण करण्यासाठी आपण लोनवर कार घेतो. लोनवर कार खरेदी करणं सहजरित्या शक्य होऊन जातं. सामान्यत: लोनवर कार खरेदी करताना तुम्हाला ते तीन किंवा पाच वर्षांसाठी कर्ज दिलं जातं. परंतु काही बँका सात वर्षांसाठीही कार लोन देतात. जेवढा जास्त कालावधी तेवढा तुम्हाला लागणारा इएमआय कमी. 

कार हे एक प्रकारचं डेप्रिसिएटिंग अॅसेट आहे हे विसरता कामा नये. यासाठी दीर्घ कालावधीचं लोन तुमच्यासाठी फायदेशी ठरणारं नाही. जर तुम्ही कमी कालावधीसाठी लोन घेतलं, तर तुम्हाला ईएमआय अधिक लागेल आणि तुम्ही तो भरला नाही, तर तुमचा क्रेडिट रिपोर्ट खराब होऊ शकतो. लोनच्या रकमेवर काही अटी शर्थीही लागू होतात. उदाहरणार्थ, काही बँका संपूर्ण एक्स शोरुमच्या किंमती इतकं लोन देतात, तर काही ८० टक्क्यांपर्यंत लोन देतात. कार लोनवर व्याजाशिवाय प्रोसेसिंग फी आणि लागणाऱ्या अन्य शुल्कांवरही नजर टाकणं गरजेचं आहे. जर तुम्हाला १ लाखाचं लोन पाच वर्षांसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही किती रक्कम फेडता.

बँक ऑफ महाराष्ट्र
इंटरेस्ट रेट - ६.५५-१०.३० टक्के
ईएमआय - १९५९-२१३९ रुपये
प्रोसेसिंग फी - फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत ३१ मार्चपर्यंत सूट

पंजाब नॅशनल बँक
इंटरेस्ट रेट - ६.७५-८.७५ टक्के
ईएमआय - १९६८-२०६४ रुपये
प्रोसेसिंग फी - ३१ मार्च पर्यंत सूट

पंजाब अँड सिंध बँक
इंटरेस्ट रेट - ६.८०-७.९० टक्के
ईएमआय - १९७१-२०२० रुपये
प्रोसेसिंग फी - ३१ मार्चपर्यंत सूट

स्टेट बँक ऑफ इंडिया
इंटरेस्ट रेट - ७.२५-७.९५ टक्के
ईएमआय - १९९२-२०२५ रुपये
प्रोसेसिंग फी - ३१ मार्च पर्यंत सूट 

अॅक्सिस बँक
इंटरेस्ट रेट - ७.४५-१४.५० टक्के
ईएमआय - २००१-२३५३ रुपये
प्रोसेसिंग फी - ३५००ते ५५०० रुपयांपर्यंत

आयसीआयसीआय बँक
इंटरेस्ट रेट - ७.५०-८.५० टक्के
ईएमआय - २०४४-२०५२ रुपये
प्रोसेसिंग फी - ३५०० ते ८५०० रुपयांपर्यंत, लोन अमाऊंटच्या आधारावर

टीप : हा डेटा ३ मार्च २०२२ चा आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँकेची वेबसाईट किंवा ब्रान्चमध्ये जाऊन माहिती घ्यावी. सोर्स - MyMoneyMantra.com

Web Title: Car On Loan Expensive to buy a car on loan See how much you repay the loan amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.