Join us  

Car On Loan : लोनवर कार घेणं पडतं महाग; पाहा किती फेडता तुम्ही लोनची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 10:45 AM

Car On Loan : नवीन कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकदा ते पूर्ण करण्यासाठी आपण लोनवर कार घेतो. पण तुम्ही त्यासाठी किती रक्कम फेडता माहितीये?

Car On Loan : नवीन कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकदा ते पूर्ण करण्यासाठी आपण लोनवर कार घेतो. लोनवर कार खरेदी करणं सहजरित्या शक्य होऊन जातं. सामान्यत: लोनवर कार खरेदी करताना तुम्हाला ते तीन किंवा पाच वर्षांसाठी कर्ज दिलं जातं. परंतु काही बँका सात वर्षांसाठीही कार लोन देतात. जेवढा जास्त कालावधी तेवढा तुम्हाला लागणारा इएमआय कमी. 

कार हे एक प्रकारचं डेप्रिसिएटिंग अॅसेट आहे हे विसरता कामा नये. यासाठी दीर्घ कालावधीचं लोन तुमच्यासाठी फायदेशी ठरणारं नाही. जर तुम्ही कमी कालावधीसाठी लोन घेतलं, तर तुम्हाला ईएमआय अधिक लागेल आणि तुम्ही तो भरला नाही, तर तुमचा क्रेडिट रिपोर्ट खराब होऊ शकतो. लोनच्या रकमेवर काही अटी शर्थीही लागू होतात. उदाहरणार्थ, काही बँका संपूर्ण एक्स शोरुमच्या किंमती इतकं लोन देतात, तर काही ८० टक्क्यांपर्यंत लोन देतात. कार लोनवर व्याजाशिवाय प्रोसेसिंग फी आणि लागणाऱ्या अन्य शुल्कांवरही नजर टाकणं गरजेचं आहे. जर तुम्हाला १ लाखाचं लोन पाच वर्षांसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही किती रक्कम फेडता.

बँक ऑफ महाराष्ट्रइंटरेस्ट रेट - ६.५५-१०.३० टक्केईएमआय - १९५९-२१३९ रुपयेप्रोसेसिंग फी - फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत ३१ मार्चपर्यंत सूट

पंजाब नॅशनल बँकइंटरेस्ट रेट - ६.७५-८.७५ टक्केईएमआय - १९६८-२०६४ रुपयेप्रोसेसिंग फी - ३१ मार्च पर्यंत सूट

पंजाब अँड सिंध बँकइंटरेस्ट रेट - ६.८०-७.९० टक्केईएमआय - १९७१-२०२० रुपयेप्रोसेसिंग फी - ३१ मार्चपर्यंत सूट

स्टेट बँक ऑफ इंडियाइंटरेस्ट रेट - ७.२५-७.९५ टक्केईएमआय - १९९२-२०२५ रुपयेप्रोसेसिंग फी - ३१ मार्च पर्यंत सूट 

अॅक्सिस बँकइंटरेस्ट रेट - ७.४५-१४.५० टक्केईएमआय - २००१-२३५३ रुपयेप्रोसेसिंग फी - ३५००ते ५५०० रुपयांपर्यंत

आयसीआयसीआय बँकइंटरेस्ट रेट - ७.५०-८.५० टक्केईएमआय - २०४४-२०५२ रुपयेप्रोसेसिंग फी - ३५०० ते ८५०० रुपयांपर्यंत, लोन अमाऊंटच्या आधारावर

टीप : हा डेटा ३ मार्च २०२२ चा आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँकेची वेबसाईट किंवा ब्रान्चमध्ये जाऊन माहिती घ्यावी. सोर्स - MyMoneyMantra.com

टॅग्स :व्यवसायवाहन