Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशांतर्गत बाजारात कारच्या विक्रीत ३.१४ टक्क्यांची वाढ

देशांतर्गत बाजारात कारच्या विक्रीत ३.१४ टक्क्यांची वाढ

देशांतर्गत बाजारात यावर्षी जानेवारीमध्ये कारच्या विक्रीत ३.१४ टक्क्यांची वाढ होऊन १,६९,३०० वाहने विकली गेली. सोसायटी आॅफ इंडियन

By admin | Published: February 10, 2015 11:16 PM2015-02-10T23:16:28+5:302015-02-10T23:16:28+5:30

देशांतर्गत बाजारात यावर्षी जानेवारीमध्ये कारच्या विक्रीत ३.१४ टक्क्यांची वाढ होऊन १,६९,३०० वाहने विकली गेली. सोसायटी आॅफ इंडियन

Car sales in the domestic market increased by 3.14 per cent | देशांतर्गत बाजारात कारच्या विक्रीत ३.१४ टक्क्यांची वाढ

देशांतर्गत बाजारात कारच्या विक्रीत ३.१४ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात यावर्षी जानेवारीमध्ये कारच्या विक्रीत ३.१४ टक्क्यांची वाढ होऊन १,६९,३०० वाहने विकली गेली. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) दिलेल्या माहितीनुसार ही विक्री जानेवारी २०१४ मध्ये १,६४,१४९ एवढी होती.
जानेवारी २०१४ च्या तुलनेत मोटारसायकलच्या विक्रीत ५.८५ टक्क्यांची घट होऊन ८,६८,५०७ वाहने विकली गेली. दुचाकीची विक्री यावर्षी जानेवारीमध्ये १.०७ टक्क्याने वाढून १३,२७,९५७ एवढी झाली. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत गेल्या जानेवारीत ५.३० टक्क्यांची वाढ होऊन ती ५२,४८१ एवढी विकली गेली. वेगवेगळ्या विभागांमध्ये वाहनांच्या विक्रीत १.६६ टक्क्याची वाढ होऊन ती १६,५०,३८२ एवढी विकली गेली. २०१४ मध्ये हीच विक्री १६,२३,४२९ एवढी होती, असे सियामने म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Car sales in the domestic market increased by 3.14 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.