सणासुदीत नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सामान्यतः कार लोनवरच घेतली जाते. कारसाठी कर्ज घेताना काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
२० टक्के डाउन पेमेंट नक्की करा जास्तीत जास्त डाउन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. कार लोनमध्ये व्याजदर खूप असतो. त्यामुळे जास्त नाही तर किमान २० टक्के डाउन पेमेंट तर नक्की करा, शिवाय कर्जाचा कालावधीही कमीच घ्या.
हेदेखील लक्षात ठेवा लोनसाठी प्रक्रिया शुल्क आणि प्री-पेमेंट शुल्काची माहिती नक्की घ्या. कार खरेदी करण्याची घाई अजिबात करू नका. कारचा विमा डीलरपेक्षा स्वतः ऑनलाइन काढल्यास बराच स्वस्त पडेल. कार विकणाऱ्या डीलरला रोख सवलतीचीही विचारणा हक्काने करा. सणासुदीमध्ये किंवा दर महिन्यालाही कार कंपन्या आपल्या वाहनांवर डिस्काउंट देत असतात. जर, डीलर रोख सवलतीला नकार देत असेल तर ॲक्सेसरीजची मागणी करा.
फिक्स्ड किंवा फ्लोटिंग व्याजदर कार लोन फिक्स्ड आणि फ्लोटिंग व्याज दर, दोन्ही प्रकारे मिळते. कार लोनचे व्याजदर सतत कमी-जास्त होत असतात. हे कारची किंमत, मॉडेल आणि कर्जाचा कालावधी यावरही निर्भर असते. कर्ज घेण्याआधी याबाबतची सर्व माहिती घ्या. बँकेच्या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या.