Join us

भन्नाट! फक्त ५० रुपयांमध्ये हाेते कारची टाकी फुल्ल; सर्वात स्वस्त पेट्राेल मिळणारे एकमेव ठिकाण? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 8:59 AM

२१ पैसे प्रतिलिटर दर; अन्य काही देशातही इंधन स्वस्त

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलच्या उच्चांकी किमतींमुळे देशभरात ओरड सुरू आहे. देशभरात बहुतांश राज्यांमध्ये पेट्राेलचे दर १०० रुपये प्रति लीटरहून अधिक आहेत. डिझेलची किंमतही ९० रुपये प्रति लीटरहून अधिक आहे. मात्र, जगात काही देश असे आहेत, जिथे इंधन अतिशय स्वस्त आहे. एवढे स्वस्त की केवळ ५० रुपयांमध्ये तुमच्या कारची टाकी फुल्ल हाेईल. हा देश आहे व्हेनेझुएला. 

व्हेनेझुएलामध्ये पेट्राेल आणि डिझेलच्या किमती अतिशय कमी आहेत. भारतीय चलनानुसार तेथे केवळ २१ पैसे प्रति लीटर एवढा पेट्राेलचा दर आहे. डिझेलची किंमत वाचून तर ताेंडात बाेटे घालण्याची वेळ येईल. डिझेल अक्षरश: शून्य डाॅलर्समध्ये विकले जात आहे. हे कसे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर आम्ही देताे. व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचा प्रचंड माेठा साठा आहे. त्यामुळे तेथे कच्चे तेल आयात करण्याची गरज पडत नाही. तेथील चलनानुसार पेट्राेलची किंमत ५,००० बाेलिव्हर प्रति लीटर एवढी आहे. भारतीय चलनामये ही किंमत केवळ २१ पैसे प्रति लीटर आहे. एका भारतीय रुपयाचे २३,७३३.९५ बाेलिव्हर एवढे चलनमूल्य आहे. 

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल