Lokmat Money > बिझनेस न्यूज > Car: नवी कार घ्यायची आहे? आता थांबा २२ महिने ! असं आहे कारण

Car: नवी कार घ्यायची आहे? आता थांबा २२ महिने ! असं आहे कारण

Car: इलेक्ट्रिक कार ही भविष्यातील वाहतूक असेल; पण सध्या पेट्रोल- डिझेल कारची मागणी कमी झालेली नाही. मोठ्या कंपन्या पारंपरिक कारचे उत्पादन वाढवण्यासाठी २१,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:17 PM2022-11-17T12:17:34+5:302022-11-17T12:19:39+5:30

Car: इलेक्ट्रिक कार ही भविष्यातील वाहतूक असेल; पण सध्या पेट्रोल- डिझेल कारची मागणी कमी झालेली नाही. मोठ्या कंपन्या पारंपरिक कारचे उत्पादन वाढवण्यासाठी २१,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहेत.

Car: Want to buy a new car? Now wait 22 months! That is the reason | Car: नवी कार घ्यायची आहे? आता थांबा २२ महिने ! असं आहे कारण

Car: नवी कार घ्यायची आहे? आता थांबा २२ महिने ! असं आहे कारण

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक कार ही भविष्यातील वाहतूक असेल; पण सध्या पेट्रोल- डिझेल कारची मागणी कमी झालेली नाही. मोठ्या कंपन्या पारंपरिक कारचे उत्पादन वाढवण्यासाठी २१,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहेत. अशा कारच्या मागणीत माेठी वाढ झाली असून, नवीन कार खरेदीसाठी २२ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागत आहे. आठ लाखांहून अधिक गाड्यांची डिलिव्हरी बाकी आहे. त्यात ९९% पेट्रोल- डिझेल कार आहेत.

एसयूव्हींची मागणी का वाढतेय? 
महिंद्रा अँड महिंद्रा पुढील एक- दोन वर्षांत एसयूव्ही उत्पादन क्षमता वार्षिक ६ लाख करणार आहे. सध्या कंपनी प्रत्येक वर्षी ३ ते ३.५० लाख एसयूव्ही तयार करते. उत्पादन वाढवण्यासाठी कंपनी ३ वर्षांत ८ हजार कोटी रुपये खर्च करणार.
टाटा मोटर्स उत्पादन क्षमता वार्षिक सहा लाखांवरून वाढवत नऊ लाखांवर नेणार आहे. यासाठी  कंपनी सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. याशिवाय मारुती सुझुकी हरयाणामध्ये नवीन उत्पादन प्रकल्प निर्माण करणार असून, यासाठी सात हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.   

ई-वाहनांना बूस्टर मिळेना
n एप्रिल-सप्टेंबरदरम्यान देशात १८,१४२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. 
n दुसरीकडे या कालावधीत १९,३६,७४० कारची विक्री झाली. नवीन कार विक्रीत ईव्हीचा वाटा ०.९३% आहे.

जगभरात काय? 
अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पेट्रोल आणि डिझेल महागल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावर ईव्हीचा वापर करत आहेत. 
जानेवारी- सप्टेंबर दरम्यान येथे इलेक्ट्रिक वाहन विक्री ७०% वाढली आहे. 

नवीन कार विक्रीतील ईव्हीचा वाटाही १ वर्षात दुप्पट झाला आहे.

कोणत्या कंपन्यांच्या कारला वेटिंग? 
मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, किया मोटर्स, ह्युंदाई, टोयोटा यांसारख्या कंपन्यांच्या पेट्रोल-डिझेल कारला मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे. 

देशात सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार दाखल
मुंबईतील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक पीएमव्ही इलेक्ट्रिकने देशातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. ईआस-ई असे या कारचे नाव आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत ४.७९ लाख रुपयांपासून सुरू होते. ही ई-कार मायक्रो श्रेणीतील आहे, असून, ती चालविण्यासाठी प्रति किमी ७५ पैसे खर्च येईल. ११ कलर ऑप्शन्स दिले आहेत. ही कार विकत घेण्यासाठी केवळ  २ हजार रुपयांमध्ये बुकिंग करण्याचा पर्याय आहे.

Web Title: Car: Want to buy a new car? Now wait 22 months! That is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.