नवी दिल्ली : इक्रानंतर आता केअर रेटिंग या कंपनीने आपले व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मोकाशी यांना सुटीवर पाठविले आहे. राजेश मोकाशींविरुद्ध सेबीला एक निनावी तक्रार मिळाली होती. या तक्रारीची चौकशी पूर्ण होईपर्यंत मोकाशी यांना सुटीवर पाठविण्यात आले आहे.
केअर रेटिंगने शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेत म्हटले की, कंपनीने टी.एन. अरुण कुमार यांना सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. ते येथे कार्यकारी संचालक (रेटिंग्स) म्हणून कार्यरत आहेत. संचालक मंडळाने निर्णय घेतला की, सेबीला मोकाशी यांच्याविरुद्ध मिळालेल्या गोपनीय तक्रारीची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सुटीवर पाठविण्यात यावे.
यापूर्वी १ जुलै रोजी इक्राने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश टक्कर यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते.
केअर रेटिंगने सीईओंना पाठविले सुटीवर
इक्रानंतर आता केअर रेटिंग या कंपनीने आपले व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मोकाशी यांना सुटीवर पाठविले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 04:45 AM2019-07-19T04:45:39+5:302019-07-19T04:45:41+5:30