Lokmat Money > बिझनेस न्यूज > भांडवल जमवण्यासाठी Yes Bank बँक विकणार १० टक्के हिस्सा; प्रायव्हेट इक्विटीसोबत सुरुये चर्चा

भांडवल जमवण्यासाठी Yes Bank बँक विकणार १० टक्के हिस्सा; प्रायव्हेट इक्विटीसोबत सुरुये चर्चा

येस बँक (Yes Bank) आपला जवळपास १० टक्के स्टेक विकण्याचा विचार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:22 PM2022-03-04T14:22:25+5:302022-03-04T14:22:46+5:30

येस बँक (Yes Bank) आपला जवळपास १० टक्के स्टेक विकण्याचा विचार करत आहे.

Carlyle plans to acquire 10 per cent in Yes Bank for 500 600 million dollar know about deals investment | भांडवल जमवण्यासाठी Yes Bank बँक विकणार १० टक्के हिस्सा; प्रायव्हेट इक्विटीसोबत सुरुये चर्चा

भांडवल जमवण्यासाठी Yes Bank बँक विकणार १० टक्के हिस्सा; प्रायव्हेट इक्विटीसोबत सुरुये चर्चा

येस बँक (Yes Bank) आपला जवळपास १० टक्के स्टेक विकण्याचा विचार करत आहे. प्रायव्हेट इक्विटी ग्रुप कार्लाइल पीअर अॅडव्हेंट इंटरनॅशनल सोबत येस बँकेत 3,750 ते 4,500 कोटी (500-600 मिलियन डॉलर्स) गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याची माहिती या प्रकरणाच्या जाणकारांकडून देण्यात आली.

बँक खासगी इक्विटी गुंतवणूकदारांसोबत 7500-11250 कोटी रुपयांचं भांडवल उभारण्यासाठी चर्चा करत आहे. नियामकाद्वारे येस बँक भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली आणल्यानंतर बँक आपली बॅलन्स शीट अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये मिळाली होती मंजुरी
येस बँकेच्या बोर्डाने 21 जानेवारी 2021 रोजी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट आणि विदेशी चलन परिवर्तनीय बाँडद्वारे 10,000 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या मंजुरीची मुदत 22 फेब्रुवारी 2022 रोजी संपणार होती. येस बँकेला गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अद्याप यश आलेलं नाही. डिसेंबरच्या अखेरिस बोर्डाने इक्विटी, बाँड्स, वॉरंट्स किंवा इतर कोणत्याही इक्विटी लिंक्ड सिक्युरिटीच्या स्वरूपात भांडवल उभारण्याच्या पूर्वीच्या प्रस्तावाच्या विस्तारास मान्यता दिली.

शेअरमध्ये किरकोळ तेजी
गुरुवारी येस बँकेच्या शेअरमध्ये 0.78 टक्क्यांची किरकोळ वाढ दिसून आली. परंतु शुक्रवारी मात्र कामकाजादरम्यान शेअरमध्ये मोठी घसरण झाली. बँकमध्ये प्रेफरन्शिअल अलॉटमेंटच्या माध्यमातून खासगी इक्विटी गुंतवणूकदारांद्वारे यात गुंतवणूक केली जाऊ शकते. 2017 मध्ये बॅन कॅपिटलनं अॅक्सिस बँकेत अशीच गुंतवणूक केली होती. 

Web Title: Carlyle plans to acquire 10 per cent in Yes Bank for 500 600 million dollar know about deals investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.