नवी दिल्ली : वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) किमती वाढू शकतात हे गृहीत धरून जीएसटी लागू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कार खरेदी झाल्यामुळे धनतेरसला होणाºया पारंपरिक कार खरेदीची चमक यंदा फिकी पडली.
मारुती सुझुकी आणि ह्युंदाई या आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांसह इतरही सर्वच कंपन्यांची रिटेल विक्रीची केंद्रे ग्राहकांची गर्दी खेचण्यात अपयशी ठरली. मारुती सुझुकीच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनतेरसला विक्रीत काहीही वाढ झाली नाही. विक्री गेल्या वर्षीएवढीच राहिली. गेल्या वर्षी ३0 हजार गाड्या विकल्या गेल्या होत्या. टोयोटा किर्लोस्करचे विक्री व विपणन संचालक एन. राजा यांनी सांगितले की, यंदाची धनतेरस गेल्या वर्षीसारखीच राहिली. विक्रीत वाढ झाली नाही. पुढील महिना आणखी निराशाजनक राहण्याची शक्यता आहे.
लक्झरी कारच्या विक्रीत तर घट झाली आहे. मर्सिडिज बेंझच्या दिल्ली-एनसीआर विभागातील एका डीलरने सांगितले की, आमची विक्री २५ ते ३0 टक्क्यांनी कमी झाली आहे. मुंबईतील बीएमडब्ल्यूच्या एका डीलरने सांगितले की, गेल्या वर्षी धनतेरसला ज्या प्रमाणे तेजी होती ती यंदा गायब आहे.
सराफा, हिरे बाजारास फटका
धनतेरसला सोन्या-चांदीची खरेदीही दरवर्षीप्रमाणे झाली नसल्याचे दिसून आले. हिरे बाजारही मंदीत असल्याचे दिसून आले. पीपी ज्वेलर्स अँड डायमंडस्चे एमडी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, नोटाबंदीसारख्या निर्णयाने धरतेरसच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. या दिवाळीत व्यवसाय १५ ते २0 टक्क्यांनी घटेल.
दरम्यान, धनतेरसच्या दिवशी दरवर्षी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होते. यंदा मात्र किमती घटल्या आहेत. दिल्लीत धनतेरसला सोने १४0 रुपयांनी उतरून ३0,७१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोन्याप्रमाणेच चांदीही ४00 रुपयांनी घसरून ४१,000 रुपये किलो झाली.
इलेक्ट्रॉनिक्स बाजार तेजीत
टिकाऊ वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बाजार मात्र तेजीत असल्याचे दिसून आले. सोनी इंडियाचे विक्री प्रमुख सतीश पद्मनाभन यांनी सांगितले की, धनतेरसला आमची विक्री २0 ते २५ टक्क्यांनी वाढली आहे. नवी उत्पादने आणि सुलभ अर्थसाह्य योजना यामुळे ग्राहकी चांगली आहे.
ऐन दिवाळीत कार बाजाराचे चाक रुतले, जीएसटीचा परिणाम, ‘धनतेरस’च्या पारंपरिक खरेदीचा उत्साह यंदा दिसलाच नाही
वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) किमती वाढू शकतात हे गृहीत धरून जीएसटी लागू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कार खरेदी झाल्यामुळे धनतेरसला होणाºया पारंपरिक कार खरेदीची चमक यंदा फिकी पडली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:45 AM2017-10-19T00:45:28+5:302017-10-19T00:45:57+5:30