Join us

उद्योजकांना कॅश फ्लोचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 4:21 PM

सिन्नर : सद्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यवसायाला पुरक प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. मग तो व्यवसाय छोटा असो अथवा मोठा, प्रत्येकाने व्यवसाय वृध्दीच्या दृष्टीने भांडवलाचे योग्य नियोजन करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आर्थिक साक्षरता मिशनचे महेश सावरीकर यांनी केले.

ठळक मुद्देकॅश फ्लो हा प्रत्येक उद्योगाचा जिव्हाळयाचा विषय असुन, प्रत्येकाने आपल्या भांडवलाचे नियोजन वेळोवेळी करणे महत्वाचे आहे. आपल्या उद्योगामध्ये आलेल्या पैशाचा विनीयोग कशा पध्दतीने करत आहोत. भविष्यात उद्योगाला भांडवलाची किती आवश्यकता आहे व येणाऱ्या नविन संधीचा आ

सिन्नर : सद्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यवसायाला पुरक प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. मग तो व्यवसाय छोटा असो अथवा मोठा, प्रत्येकाने व्यवसाय वृध्दीच्या दृष्टीने भांडवलाचे योग्य नियोजन करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आर्थिक साक्षरता मिशनचे महेश सावरीकर यांनी केले.माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये निमाच्यावतीने उद्योजकांसाठी आयोजित कॅश फ्लो प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, अतिरिक्त चिटणीस संदिप भदाणे, पायाभूत उपसमितीचे अध्यक्ष किरण वाजे, निमा हाऊस उपसमितीचे अध्यक्ष राहुल नवले, तक्रार निवारण उपसमितीचे अध्यक्ष अतुल अग्रवाल व सॅटरडे क्लब, सिन्नरचे अध्यक्ष अमोल कासार आदी उपस्थित होते.कॅश फ्लो हा प्रत्येक उद्योगाचा जिव्हाळयाचा विषय असुन, प्रत्येकाने आपल्या भांडवलाचे नियोजन वेळोवेळी करणे महत्वाचे आहे. आपल्या उद्योगामध्ये आलेल्या पैशाचा विनीयोग कशा पध्दतीने करत आहोत. भविष्यात उद्योगाला भांडवलाची किती आवश्यकता आहे व येणाऱ्या नविन संधीचा आपण कसा उपयोग करून घेतो याचा तंतोतंत ताळेबंद प्रत्यकाने करणे फार महत्वाचे असल्याचे निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर यांनी सांगितले.अतुल अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. संदिप भदाणे यांनी आभार मानले. याप्रसंगी सुरेंद्र मिश्रा, शिवाजी आव्हाड, योगेश मोरे, दत्ता ढोबळे, दिपक जाधव, व्हि.वाय. वांद्रे, अरूण गाडेकर, चेतन अटृरे, निनाद कदम, अरूण खालकर, प्रफ्फुल फिरके, बी. ए. देशमुख, भाईदास पाटील, सुधाकर महालकर, सुरेश जोंधळे, सुहास अटुरे गणेश बोडके आदींसह उद्योजक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.