मुंबई, दि. 20 - ई-कॉमर्स कंपन्यांचा फेस्टिव्हल सिजन सुरु झाला आहे. नामांकित फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन कंपन्या आपल्या ग्राहकांना नव-नवीन ऑफर्स घेऊन येत आहेत. आता यामध्येच पेटीएमने सुद्धा उडी घेतली आहे.
पेटीएमने कॅशबॅक सेल सुरु केला असून याला मेरा कॅशबॅक सेल असे नाव दिले आहे. पेटीएमचा हा सेल आजपासून तीन दिवस चालणार आहे. यामध्ये अनेक स्मार्टफोन खरेदीवर जवळपास 15,000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक देण्यात येत आहे. Apple, Samsung, Google, Gionee, Vivo, Motorola यांसारखे अनेक स्मार्टफोन यामध्ये आहेत. याव्यतिरिक्त जे ग्राहक ICICI च्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर स्मार्टफोन खरेदी करतात. त्यांना 5 टक्के जादा कॅशबॅक दिला जाणार आहे. Paytm Mall मध्ये Intex, Asus, HTC आणि Gionee यासारखे स्मार्टफोनवर 16 टक्क्यापर्यंत कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे. मात्र, अशी चर्चा आहे की पेटीएमवर दिली जाणारी कॅशबॅक ऑफर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या तुलनेत म्हणावी तशी खास नाही आहे.
पेटीएमने दिलेली ऑफर्स पाहता, पेटीएम मॉलवर जेट ब्लॅक iPhone 7 Plus (256GB) हा स्मार्टफोन 76,900 रुपयांना सेल करण्यात येत आहेत. तर, जेट ब्लॅक iPhone 7 Plus (128) हा ग्राहक 65,500 रुपयांना खरेदी करु शकणार आहेत. तसेच, त्यांना iPhone 7 (256GB) हवा आहे, त्यांना तो 58,399 रुपयांना मिळणार आहे. याचबरोबर, अनेक इलेक्ट्रॉनिक, फॅशन, गॅझेट्स आणि अन्य वस्तूंवर सवलती देण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, सोशल मीडियात लोकप्रिय असलेली ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी बिग बिलियन डे नावाने सेल आणला आहे. यामध्ये गॅझेट्स आणि अन्य वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. आसुस, मोटोरोला आणि एचटीसी या बजेटमधील स्मार्टफोनवर मोठी सवलत देण्याबाबत ई-कॉमर्स कंपन्या चर्चा केली आहे.यासोबतच सॅमसंग गॅलॅक्सी एस 7 आणि रेडमी 4A या स्मार्टफोनच्या किंमतीत सुद्धा जास्त सूट मिळणार आहे. लिनोव्हा K8 आणि पॅनासॉनिक Eluga Ray 700 ची चर्चा आहे.
फेस्टिव्हल सीजनमधील या सेलला फ्लिपकार्टने बिग लूट असे म्हटले आहे. यामध्ये टीव्ही, फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीन या वस्तूंवर जवळपास 70 टक्के सवतल दिली आहे. तसेच, 32 इंच टीव्हीवर हार्ड-टू-मिस अशी ऑफर सुद्धा आहे. स्मार्ट आणि अल्ट्रा एचडी 4K टीव्हीवर सुद्धा 40 टक्के सूट मिळणार आहे. एवढेच, नव्हे तर मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर 70 हजार रुपयापर्यंतची सवलत देण्यात आली आहे.
फॅशन आणि लाइफस्टाइमध्ये 500 ब्रॅंडच्या वस्तूंवर याआधी कधीच नाही, अशी ऑफर असणार आहे. याशिवाय लहान इलेक्ट्रॉनिक वस्तू जशा की डीएसएलआर कॅमे-यासोबत मोफत गिफ्ट, प्रिंटर्सवर एक्सचेंग ऑफर आहे. याबरोबर, अॅपल आयपॅड ईएमआयवर घेता येऊ शकेल, अशी सुविधा ग्राहकांना देण्यात आली आहे. दरम्यान, फ्लिपकार्ट चार दिवसांचा फेस्टिव्हल सेल येत्या 20 सप्टेंबरपासून सुरु करणार आहे. तर, अॅमेझॉनचा सेल 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
अॅमेझॉनवर सेलची सुरुवात प्राईम मेंबर्ससाठी 12 तास आधी होणार आहे. अॅमेझॉनने गृह उपयोगी वस्तूंवर आणि फॅशनच्या प्रॉडक्ट्सवर 70 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. मोबाईल फोनवर 40 टक्के, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 60 टक्के सवतल ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय अॅमेझॉनच्या पे अॅपमधून खरेदी करणा-या ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे.
Paytm mall sale : अॅपल, गुगल यांसारख्या अनेक स्मार्टफोनवर कॅशबॅकची ऑफर
ई-कॉमर्स कंपन्यांचा फेस्टिव्हल सिजन सुरु झाला आहे. नामांकित फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन कंपन्या आपल्या ग्राहकांना नव-नवीन ऑफर्स घेऊन येत आहेत. आता यामध्येच पेटीएमने सुद्धा उडी घेतली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 06:31 PM2017-09-20T18:31:29+5:302017-09-20T18:37:41+5:30
ई-कॉमर्स कंपन्यांचा फेस्टिव्हल सिजन सुरु झाला आहे. नामांकित फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन कंपन्या आपल्या ग्राहकांना नव-नवीन ऑफर्स घेऊन येत आहेत. आता यामध्येच पेटीएमने सुद्धा उडी घेतली आहे.
Highlightsमेरा कॅशबॅक सेल 15,000 रुपयांपर्यंतची कॅशबॅकअनेक वस्तूंवर ऑफर्स