नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर उपाय म्हणून आॅइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) आणि आॅईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) यांसारख्या कंपन्यांच्या देशांतर्गत तेल व नैसर्गिक वायू उत्पादनांवर आकस्मिक लाभ कर (विंडफॉल टॅक्स) लावण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. त्यांना हा कर लावून, ग्राहकांवरील कर कमी करायचा आणि दिलासा द्यायचा, अशी सरकारची योजना आहे.अचानक मिळालेल्या जास्तीच्या नफ्यावर लावल्या जाणाऱ्या करास आकस्मिक लाभ कर असे संबोधले जाते. सध्या जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे तेल कंपन्यांचे चांगभले झाले आहे. भारतात तेल खाणी चालविणाºया कंपन्यांच्या नफ्यातही अचानक वाढ झाली आहे. या अतिरिक्त लाभावर आकस्मिक लाभ कर लावण्याची सरकारची योजना आहे. या संबंधीच्या प्रस्तावानुसार भारतातील तेल क्षेत्रात उत्पादित तेलाची आधार किंमत प्रति बॅरल ७0 डॉलर गृहीत धरली जाईल. त्यामुळे ७0 डॉलरपर्यंतच्या किमतीवर हा कर लागणार नाही. मात्र ७0 डॉलरच्या पुढे जेवढी वाढीव किंमत कंपनीला मिळेल, त्यावर आकस्मिक लाभ कर लागेल.अनेक देशांत कर२00८ मध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, तेव्हा तत्कालिन सरकारने हा कर लावण्याचा प्रस्ताव आणला होता. तथापि, केयर्न इंडियासारख्या खासगी कंपन्यांनी त्याला कडाडून विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव तेव्हा बारगळला होता. जगात अनेक देशांत हा कर लावला जातो. ब्रिटनने २0११ मध्ये तेल व नैसर्गिक वायूच्या ७५ डॉलरवरील किमतीवर हा कर लावला होता. चीनने १ एप्रिल २00६ रोजी आपल्या तेल उत्पादक कंपन्यांवर हा कर लावला. २0१२ मध्ये त्यात वाढ केली.
देशी कंपन्यांवर लावणार आकस्मिक लाभ कर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 2:04 AM