Lokmat Money > बिझनेस न्यूज > काेचर दांपत्याला झटका, काेर्टाचा दिलासा नाही; हस्तक्षेपास नकार

काेचर दांपत्याला झटका, काेर्टाचा दिलासा नाही; हस्तक्षेपास नकार

दीपक काेचरचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 04:15 AM2020-12-02T04:15:43+5:302020-12-02T04:15:54+5:30

दीपक काेचरचा अर्ज फेटाळला

The catcher couple is shocked, not relieved by Carter; Refusal to intervene | काेचर दांपत्याला झटका, काेर्टाचा दिलासा नाही; हस्तक्षेपास नकार

काेचर दांपत्याला झटका, काेर्टाचा दिलासा नाही; हस्तक्षेपास नकार

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा काेचर यांना सर्वाेच्च न्यायालयाने झटका दिला आहे. बॅंकेतून निलंबित केल्यासंदर्भात हायकाेर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तर त्यांचे पती दीपक काेचर यांचा जामीन अर्ज आज मुंबईत विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे काेचर दांपत्याला दुहेरी झटका बसला आहे.
चंदा काेचर यांच्यावर पदाचा गैरवापर करून पती दीपक काेचर यांना आर्थिक लाभ पाेहाेविल्याचा आराेप ठेवण्यात आला हाेता. व्हिडिओकाॅन उद्याेगसमूहाला कर्जप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आराेपावरून चंदा काेचर यांना निलंबित केले हाेते. याविराेधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. 

बाेनसही वसूल हाेणार 
बॅंकेने एप्रिल २००९ ते मार्च २०१८ या कालावधीत ७.४२ काेटी रुपयांचा बाेनस देण्यात आला हाेता. ताेदेखील वसूल करण्यात येणार आहे. बॅंकेने अंतर्गत धाेरणांनुसार काही कारणास्तव त्यांना निलंबित केल्याचे कळविले हाेते. त्यामुळे त्यांना काेणतेही लाभ मिळणार नसल्याचेही स्पष्ट केले हाेते.

ईडीचे आव्हान
चंदा काेचर यांना प्रिव्हेंशन ऑफ मनी लाॅंड्रिंग ॲथाेरिटीने क्लीन चिट देण्याविराेधात अंमलबजावणी संचालनालयाने लवादामध्ये आव्हान दिले आहे. मालमत्ता जप्तीविराेधात ॲथोरिटीने निर्णय दिला हाेता. हा निर्णय एकतर्फी व अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचा दावा केला आहे.

Web Title: The catcher couple is shocked, not relieved by Carter; Refusal to intervene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.